उकाड्यावर कलिंगडाचा उतारा!
कळवा, खारेगावात बैलगाडीतून विक्रीसाठी येणाऱ्या फळांना ग्राहकांची पसंती
कळवा, ता. २४ (बातमीदार) ः सध्या उकाड्याचे दिवस सुरू झाल्याने शरीराला थंडाव्याची ऊब देण्यासाठी सध्या ग्राहकांची गोड, थंड व रसाळ कलिंगडाच्या दुकानाकडे पावले वळू लागली आहेत. परंतु सध्या बाजारपेठेत गुजरात आणि कर्नाटकची मोठी कलिंगडे दाखल झाली असली तरी ग्राहकांचा कल मात्र अलिबाग आणि पालघरहून बैलगाडीतून येणाऱ्या गावरान कलिंगडांकडे अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या शहरात गुजरात व कर्नाटकमधील पांढरे पट्टेवाली व लांब कलिंगडे दाखल झाली आहेत. काही ठिकाणी कलिंगडाचा रंग लालभडक करण्यासाठी आणि गोडी वाढवण्यासाठी सॅकरीन या रसायनाचे इंजेक्शन देण्याचे प्रकार समोर येत आहेत. असे असताना अलिबाग व ठाणे जिल्ह्यातून विक्रीसाठी येणाऱ्या बैलगाडीतील कलिंगडाला सध्या जास्त मागणी वाढली आहे. कळवा-बेलापूर रस्त्यावरील स्वर्गीय मुकुंद केणी स्पोर्ट कॉम्प्लेक्सच्या पाठीमागील जागेवर दरवर्षीप्रमाणे अनेक बैलगाड्यांमध्ये कलिंगडे विक्रीसाठी दाखल झाली आहेत. अलिबाग, पालघर व ठाणे जिल्ह्यातून शेतकऱ्यांकडून ही कलिंगडे रोज सकाळी बैलगाडीतून कळवा, खारेगाव, विटावा, पारसिकनगर आणि ठाणे बाजारपेठ या ठिकाणी विक्रीसाठी येतात. या गाड्यांमधील कलिंगडे गोड व रसाळ असून ती थेट शेतकऱ्यांकडून येत असल्याने कमी भावात उपलब्ध होतात. यामुळे ग्राहकांची पसंती सध्या या कलिंगडांना मिळताना दिसत आहे. प्रत्येक गाडीवर रोज १०० ते १५० कलिंगडे विकली जात आहेत.
आम्ही अलिबागवरून कलिंगडे खरेदी करून बैलगाडीतून स्वस्त दरात विकत असल्याने ग्राहकांची रोज गर्दी होते.
- काळू बारगडे, कलिंगड विक्रेता
सध्या हातगाडीवर कलिंगडे विक्रीसाठी येतात. ती कापल्यावर विशिष्ट प्रकारचा वास येत असल्याने कलिंगड खायची भीती वाटते. त्या मानाने बैलगाडीमधील कलिंगडे स्वादिष्ट असतात.
- संतोष गायकर, ग्राहक, कळवा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.