मुंबई

ठाण्यात टेस्ट ड्राईव्हदरम्यान कारला आग

CD

ठाण्यात टेस्ट ड्राईव्हदरम्यान कारला आग
तिघे थोडक्यात बचावले
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : घोडबंदर रोडवरील हिरानंदानी इस्टेट परिसरात टेस्ट ड्राईव्हसाठी नेण्यात आलेल्या एका धावत्या चारचाकी वाहनाला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी (ता. २४) घडली. या वाहनातील तिघेही प्रवासी वेळेत बाहेर पडल्याने मोठे अनर्थ टळले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिली.
ठाण्याच्या पातलीपाडा, हिरानंदानी इस्टेट येथील ठाणे महापालिका गार्डनजवळ, टेस्ट ड्राईव्हसाठी वापरण्यात येणाऱ्या चारचाकी वाहनाला मंगळवारी दुपारी आग लागल्याची माहिती तलरेजा नामक महिलेने आपत्ती व्यवस्थापन कक्षेला दिली. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षेच्या कर्मचाऱ्यांसह पोलिसांनी धाव घेतली. तसेच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक व स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यात यश आले. टाटा कंपनीचे कर्मचारी असलेले वाहन चालक अजय गायकवाड हे त्यांच्यासह दोन ग्राहक त्या वाहनामधून प्रवास करत होते. आग लागताच तिघांनीही प्रसंगावधान राखत तात्काळ वाहनाबाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला. या आगीत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कोणालाही दुखापत झाली नाही, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Char Dham Yatra 2026 : चारधाम यात्रेदरम्यान मोबाईवर बंदी, पूजा-अर्चा, विधीचे शुल्कही वाढले, जाणून घ्या नवे नियम

MI vs PBKS Live: रोहित शर्माची माघार! मुंबई इंडियन्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल, सलामीला कोणती जोडी?

Ganesh Naik : वाघ-बिबट्यांच्या शिकारीमागे आंतरराष्ट्रीय जाळे; वनमंत्री गणेश नाईक यांचा गौप्यस्फोट

RTE Admission Issue : वसईत आरटीई प्रवेशावरून गोंधळ; टोकन न मिळाल्याने पालकांमध्ये संताप, भर उन्हात पालकांच्या लांबचलांब रांगा

Latest Marathi News Live Update : टीसीएस प्रकरणात आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT