मुंबई

सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेला रस्ता सुरक्षा अभियान पुरस्कार

CD

सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेला रस्ता सुरक्षा अभियान पुरस्कार
अपघातग्रस्तांना मदत व आपत्तीतील धाडसी कार्याची दखल
रोहा, ता. २४ (बातमीदार) : सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था, कोलाड-रोहा या संस्थेच्या अनेक वर्षांच्या निस्वार्थ सामाजिक सेवेचा गौरव म्हणून रस्ता सुरक्षा अभियान पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला. रस्ते अपघातांतील जखमींना तातडीने आरोग्य केंद्रात दाखल करणे, महापुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करणे तसेच आपत्ती काळात जीव धोक्यात घालून मदतकार्य करणे अशा मानवतावादी कार्यामुळे संस्थेची विशेष ओळख निर्माण झाली आहे.
महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र, महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे, नवी मुंबई येथे आयोजित प्रशासकीय कार्यालय उद्घाटन सोहळ्यात अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंखे, पोलीस अधीक्षक तानाजी चिखले व पोलीस उपअधीक्षक पुष्पलता दिघे यांच्या हस्ते संस्थेला सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारामुळे संस्थेच्या कार्याला नवे बळ मिळाले असून सामाजिक क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवकांचा उत्साह वाढला आहे.

फोटो कॅप्शन : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करताना.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला खरंच T20 World Cup चा गांभीर्य असेल तर...! R Ashwin ने सांगितला विजयाचा मंत्र, इंग्लंडला अडचणीत आणणारी चाल...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घरबसल्या पाहा हे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट

Latest Marathi News Live Update : बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची फसवणूक, पोलिसांनी केला पर्दाफाश

MHT CET Admission : ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस २७ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह मुदतवाढ

Thane News: मुरबाड नगर पंचायतमध्ये सत्तांतराची नांदी? नगराध्यक्ष संतोष चौधरींची कसोटी; किसन कथोरेंना शह देणारे आता भाजपच्या गोटात

SCROLL FOR NEXT