गो. म. वेदक विद्यामंदिराला ए प्लस श्रेणी
गुणवत्तापूर्ण शैक्षणिक उपक्रमांमुळे राज्यात मानाचे स्थान; रायगडभर अभिनंदन
तळा, ता. २४ (बातमीदार) : श्री गो. म. वेदक विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाने शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा अंतर्गत बाह्य मूल्यांकनात ए प्लस श्रेणी मिळवत राज्यातील गुणवत्तापूर्ण शैक्षणिक संस्थांमध्ये आपले स्थान भक्कम केले आहे. राज्यातील हजारो शाळांमधून निवड झालेल्या संस्थांपैकी रायगड जिल्ह्यातील मोजक्याच शाळांना हा मान मिळाला असून त्यात या विद्यालयाचा समावेश आहे. सुसज्ज ग्रंथालय, संगणक कक्ष, स्मार्ट बोर्डद्वारे अध्यापन, आरओ पाणी, विविध सराव परीक्षा, तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन व समुपदेशन यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. शैक्षणिक निकालाबरोबरच कला, क्रीडा, विज्ञान व सांस्कृतिक स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
चौकट
सर्वांगीण विकासाला प्राधान्य
शैक्षणिक गुणवत्तेबरोबर व्यक्तिमत्त्व विकास, नैतिक शिक्षण व पर्यावरण जनजागृती यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व नेतृत्वगुण विकसित होत असून हीच ए प्लस श्रेणी मिळवण्यामागील प्रमुख ताकद ठरली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.