जिल्हा कारागृहात स्वच्छतेविषयी जनजागृती कार्यक्रम
अलिबाग, ता. २४ (वार्ताहर) ः संत गाडगे महाराज हे थोर समाजसुधारक होते. त्यांनी कीर्तनातून समाज प्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि स्वच्छता संदेशाचा प्रसार केला. त्यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी स्वच्छता अभियान आणि समाजप्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून अलिबाग जिल्हा कारागृहात दाखल असलेल्या बंद्यांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृती निर्माण व्हावी, याकरिता जनजागृती कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रबोधन सामाजिक सेवा संस्था डॉ. मिलिंद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समाज सुधारण्याच्या चळवळीमध्ये थोर समाजसेवक संत गाडगेबाबा यांचे विसाव्या शतकात मोलाचे योगदान होते. याची जाणीव बंद्यांना करून दिली. तसेच संत गाडगे महाराज यांनी स्वच्छतेचे ध्येय हाती घेऊन त्यांनी गावागावात जाऊन समाजातील लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. थोर समाजसेवक संत गाडगेबाबा यांनी समाजात असलेल्या वाईट चालीरीती, परंपरा, अज्ञान, अंधश्रध्दा, अस्वच्छता दूर करण्याकरीता कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करुन समाज सुधारण्याचे कार्य केले. तसेच स्वतःच्या मनाची, शरीराची व आपण राहत असलेल्या परिसराची स्वच्छता करण्याबाबत बंद्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाकरीता अलिबाग जिल्हा कारागृह अधीक्षक विशाल बांदल, कारागृह शिपाई रविंद्र वाघमारे, प्रशांत पाटल आदी उपस्थित होते.
warm regards,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.