मुंबई

नेरूळमधील पदपथाच्या कामाच्या गुणवत्तेची चौकशी करा

CD

नेरूळमधील पदपथाच्या कामाच्या गुणवत्तेची चौकशी करा
माहिती फलक नाही; नव्या कामाला तडे, डासांच्या प्रादुर्भावाने नागरिक त्रस्त
नेरूळ, ता. २४ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर ६ परिसरात राजीव गांधी उड्डाणपुल ते पामबीच मार्गालगत विशाल सोफा आर्ट ते नेरूळ सी व्ह्यू सोसायटीदरम्यान सुरू असलेल्या पदपथाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे महादेव पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. कामाच्या ठिकाणी आवश्यक असलेला माहिती फलक लावण्यात आलेला नसल्याने कामाचा निधी, कालावधी व स्वरूप याबाबत नागरिकांना कोणतीही माहिती मिळत नसल्याची तक्रार करण्यात आली आहे.
नुकतेच सुरू झालेल्या पदपथाला तडे गेल्याचे निदर्शनास आले असून कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कंत्राटदाराने ठेवलेल्या पाण्याच्या टाकीत कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली असून डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे साथीच्या आजाराची भीती स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
पालिका प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून माहिती फलक लावणे, कामाची गुणवत्ता तपासणे व पाण्याच्या टाकीची स्वच्छता करण्याचे तातडीने निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Thane News: मलंगगड फ्युनिक्युलरवरून नवा वाद! ‘ऑपरेटिंग सिस्टीम’ बेजबाबदार व्यक्तीकडे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार

Palus Municipal Council : पलूस पालिकेचा महत्त्वपूर्ण निर्णय; पाणी योजनेला मुदतवाढ, स्मशानभूमी दुरुस्तीला हिरवा कंदील

Jalgaon Smart Meter : जळगावकरांना महावितरणचा डिजिटल 'शॉक'! थकबाकीदारांची वीज आता परस्पर होणार खंडित

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

SCROLL FOR NEXT