नवी मुंबई महापालिका मुख्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी
नेरूळ, ता. २४ (बातमीदार) : स्वच्छता, सामाजिक न्याय आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणारे संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई महापालिकेच्या वतीने महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.
या वेळी उपमहापौर दशरथ भगत, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व डॉ. राहुल गेठे, नगरसेविका माधुरी सुतार, सायली शिंदे, शैला पाटील, प्रिती भगत यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. प्रशासन विभागाचे उपआयुक्त किसनराव पलांडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त डॉ. कैलास गायकवाड, मालमत्ताकर विभागाचे उपआयुक्त अमोल पालवे, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, सहायक संचालक नगररचना सोमनाथ केकाण, मुख्य विधी अधिकारी अभय जाधव आणि कार्यकारी अभियंता तानाजी शिंदे यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
संत गाडगेबाबा यांनी दिलेला स्वच्छतेचा आणि समाजसेवेचा संदेश आचरणात आणण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला. महापालिकेच्या स्वच्छता उपक्रमांना अधिक बळ देण्याचा निर्धारही मान्यवरांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे वातावरण श्रद्धा व कृतज्ञतेने भारावले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.