मुंबई

जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

CD

जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
तुर्भे, ता. २४ (बातमीदार) : जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे महिलांसाठी विविध स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त संजय शिंदे यांनी दिली. नमुंमपा कार्यक्षेत्रातील महिलांसाठी ४ ते ६ मार्चदरम्यान समूह गायन, महिला भजनी मंडळ भजन, लघु व्हिडीओ, कोळी नृत्य, समूह नाटिका व मंगळागौर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धांच्या प्राथमिक व अंतिम फेऱ्या वाशी येथील महात्मा फुले स्मृती भवन येथे होणार आहेत.
८ मार्च रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह येथे मुख्य कार्यक्रमात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, स्पर्धांचे पारितोषिक वितरण तसेच महिलांनी उत्पादित केलेल्या साहित्याच्या विक्रीसाठी मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. भावे येथील कार्यक्रमात पैठणी लकी ड्रॉही होणार आहे. स्पर्धांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २ मार्च तर पुरस्कार व स्टॉलसाठी ४ मार्च आहे. अर्ज समाजविकास विभाग व सर्व विभाग कार्यालयांत उपलब्ध आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT