मुंबई

शिवजयंतीनिमित्त महिलांचा हळदीकुंकू

CD

शिवजयंतीनिमित्त महिलांचा हळदीकुंकू
मुरबाड (वार्ताहर) : शिवजयंतीनिमित्ताने टेंभरे (बु.) ग्रामपंचायतीच्या वतीने महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ घेण्यात आला. कार्यक्रमात गावच्या पहिल्या महिला उपसरपंच सुनंदा गायकवाड यांच्या हस्ते उपस्थित महिलांना डस्टबिनचे वाटप करण्यात आले. ग्रामस्वच्छता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे ग्रामसेविका ज्योती पवार यांनी सांगितले. या माध्यमातून महिलांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वेळी सरपंच सुहास केंबारी, माजी उपसरपंच अभय केंबारी, धनाजी टोहके, ग्रामपंचायत सदस्य संजय केंबारी, नंदा केंबारी, शुभांगी पवार, मंगला खुटारे, अंगणवाडी सेविका मोनिका केंबारी तसेच सामाजिक कार्यकर्त्या रेश्मा केंबारी उपस्थित होते. कार्यक्रमाला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. शिवजयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमातून स्वच्छतेचा संदेश देण्याचा ग्रामपंचायतीचा हा प्रयत्न ग्रामस्थांनी कौतुकास्पद ठरविला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : भारतात बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या 24 बांगलादेशी नागरिक ताब्यात, तृतीयपंथीयांची संख्या अधिक

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT