मुंबई

उन्हाळ्याचा कडक आणि रमझानमुळे रसाळ फळांच्या मागणीत वाढ..

CD

रमजानमुळे रसाळ फळांच्या मागणीत वाढ
फळांच्या भावांत ५ ते १० रुपयांची वाढ
ठाणे, ता. २४ (बातमीदार) : कडाक्याचे ऊन आणि रमजानमुळे रसाळ फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. खरबूज, पपई, केळी, सफरचंद, संत्री, मोसंबी, द्राक्ष यासारख्या फळांच्या भावांत ५ ते १० रुपयांनी वाढ झाली आहे. दरम्यान, दरवाढ झाली असतानाही फळ खरेदीवर त्याचा कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. फळखरेदीसाठी नागरिकांनी बाजारात गर्दी केली आहे.
थंडीचा महिना संपला आणि उन्हाचा कडाका वाढू लागला असून, घशाला कोरड पडत आहे. त्यातच मुस्लिम बांधवांचा रमजान हा पवित्र महिना सुरू आहे. त्यामुळे नागरिक रसाळ फळांचा आस्वाद घेत आहेत. या रसाळ फळांची बाजारपेठेत आवक वाढली असून, नागरिक त्या फळांवरती ताव मारत आहेत; मात्र या फळांच्या भाववाढीचा तडाखा नागरिकांना बसत आहे.

सध्या रमजान व उन्हाळ्यामुळे रसाळ फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. त्यात कलिंगड, टरबूज, पपई, संत्रा, मोसंबी, सफरचंद, केळी, स्ट्रॉबेरी, जाम, द्राक्ष, अननस यासारख्या रसाळ फळांची मागणी वाढली आहे. मागणी वाढूनही ग्राहक या फळांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत असल्याचे फळविक्रेत्यांनी सांगितले.
- धीरज गुप्ता, फळविक्रेता

सध्याचे फळांचे भाव (किलो रुपये) :
१. सफरचंद : २५० ते ३००
२. पेर : २५० ते ३००
३. डाळिंब : २०० ते २५०
४. केळी : ६० डझन/इलायची केळी : ८० डझन
५. मोसंबी : १५० ते २००
६. संत्रा : २००
७. द्राक्ष (हिरवी) : २०० ते २५०
८. द्राक्ष (काळी) : २०० ते २५०
९. कलिंगड : ३५ ते ४०
१०. टरबूज : ८०
११. नारळ : ८०
१२. अननस : १६०
१३. स्ट्रॉबेरी : २०० ते २५०
१४. पपई : ६०
१५. किवी : १२० पॅकेट (३ नग)
१६. ड्रॅगन फ्रुट : ६० ते ७०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला खरंच T20 World Cup चा गांभीर्य असेल तर...! R Ashwin ने सांगितला विजयाचा मंत्र, इंग्लंडला अडचणीत आणणारी चाल...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घरबसल्या पाहा हे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट

Latest Marathi News Live Update : बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची फसवणूक, पोलिसांनी केला पर्दाफाश

MHT CET Admission : ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस २७ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह मुदतवाढ

Thane News: मुरबाड नगर पंचायतमध्ये सत्तांतराची नांदी? नगराध्यक्ष संतोष चौधरींची कसोटी; किसन कथोरेंना शह देणारे आता भाजपच्या गोटात

SCROLL FOR NEXT