मुंबई

हिंद दी चादर कार्यक्रमासाठी तात्पुरत्या पुलाच्या कामाला वेग

CD

हिंद दी चादर कार्यक्रमासाठी तात्पुरत्या पुलाच्या कामाला वेग
वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी खारघर कोपरा नाल्यावर तिसऱ्या मार्गाची व्यवस्था
खारघर, ता. २४ (बातमीदार) : श्री गुरु तेग बहादूरजी यांच्या ३५० व्या शहिदी समागमनिमित्त होणाऱ्या “हिंद दी चादर” कार्यक्रमासाठी देशभरातून सुमारे २० लाख भाविक खारघरमध्ये दाखल होणार असल्याने वाहतूक व्यवस्थेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. हिरानंदानी प्रवेशमार्गावरील होणारी कोंडी टाळण्यासाठी कोपरा पुलालगतच्या नाल्यावर तात्पुरत्या स्वरूपात तिसरा पूल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कार्यक्रमानंतर हा पूल हटवून नाल्यातील पाण्याचा प्रवाह पूर्ववत करण्यात येणार आहे.
पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री व राज्यातील मंत्र्यांच्या उपस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते दुरुस्ती, पदपथ सुशोभीकरण, चौकांची रंगरंगोटी व प्रकाशयोजना अशी विविध कामे वेगाने सुरू आहेत. या कामांसाठी सिडको, महसूल विभाग आणि पनवेल महापालिका प्रशासनाला कार्यरत करण्यात आले आहे.

चौकट
कायमस्वरूपी पुलाची नागरिकांची मागणी
पाच लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या खारघरमध्ये कोपरा पुलाजवळ नेहमीच वाहतूक कोंडी होते. यापूर्वी महाराष्ट्र भूषण सोहळ्यावेळीही तात्पुरता पूल उभारण्यात आला होता. दरवेळी लाखो रुपये खर्च करून तात्पुरती व्यवस्था करण्याऐवजी कायमस्वरूपी पूल उभारावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. दीर्घकालीन वाहतूक नियोजनासाठी हा पूल आवश्यक असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawrence Bishnoi gang threat : खळबळजनक! महाराष्ट्रातील काँग्रेस आमदाराला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Panvel: पनवेलकरांसाठी मोठा निर्णय! सिडको वसाहत आणि २९ गावांना जोडणारी महापालिकेची बससेवा सुरू होणार; बसमार्ग आणि थांबे कसे ठरणार?

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात हरभरा काढणीला वेग, उत्पन्नातही मोठी वाढ; बळीराजा सुखावला

Raksha Khadse : "आमदारांच्या मुलींच्या हस्ते उद्घाटनं उरकताय का?" रक्षा खडसेंनी 'महावितरण'ला झापले

SCROLL FOR NEXT