मुंबई

नालासोपारा येथे बहिणीची कोयत्याने हत्या; आईवरही हल्ला

CD

नालासोपारा येथे बहिणीची कोयत्याने हत्या; आईवरही हल्ला

बोळिंज, ता. २४ (बातमीदार) ः नालासोपारा पूर्वेतील टाकी रोड परिसरात मंगळवारी (ता. २४) पहाटे घडलेल्या धक्कादायक घटनेत सख्ख्या भावाने कोयत्याने बहिणीची हत्या केली. भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडलेल्या आईवरही त्याने हल्ला केला. या घटनेत सुप्रिया कानडे (३५) यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांची आई गंभीर जखमी आहे. वसई-विरार शहरात आठवडाभरात घडलेली ही चौथी हत्या ठरली आहे.
टाकी रोड येथील सर्वोदय वसाहतीतील साईधाम वेल्फेअर चाळीत सुप्रिया कानडे वास्तव्यास होत्या. त्यांची आई व भाऊ शेजारीच राहत होते. घटनेच्या वेळी सुप्रियांचे पती गावी गेले होते. मंगळवारी (ता. २४) पहाटे सुप्रिया व त्यांचा भाऊ अजित मालुष्टे (४०) यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला. संतापाच्या भरात अजितने कोयत्याने बहिणीच्या मानेवर व छातीवर वार केले. गंभीर जखमी झालेल्या सुप्रियांचा जागीच मृत्यू झाला. आईने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याने तिच्यावरही वार केले. जखमी आईला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास घटनेची माहिती मिळाली. त्या वेळी घराची पाहणी केली असता हा प्रकार उघडकीस आला, अजित हा मनोरुग्ण असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती स्थानिक रहिवासी महेंद्र कदम यांनी दिली. याप्रकरणी बोळिंज पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik Case: टीसीएस प्रकरणात नवा ट्विस्ट! 'एचआर' निघाली प्रेग्नंट; फरार निदा खान मुंबईत

Shaktipeeth Highway : ब्रह्मचैतन्य महाराजांच्या गोंदवल्याची शासनाकडून उपेक्षा? शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यात समावेश, पण ग्रामपंचायतीसमोर मोठं आव्हान

पुढचे 24 तास महत्त्वाचे! मीन राशीत 'चतुर्ग्रही राजयोग'; लक्ष्मी-कुबेराच्या कृपेने 'या' 5 राशी होणार मालामाल!

Solapur Temperature: साेलापूरचा पारा ४३.४ अंशांवर; तापमानाचा पुन्हा उच्चांक; शनिवारपासून उतरणार पारा, अवकाळी अन्‌ ढगाळ वातावरणाचाही अंदाज!

मित्रानेच केला मित्राचा गेम, मुली पटवण्याची शर्यत अन् पैशांच्या वादातून घेतला बदला; अमरावती प्रकरणात मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT