मुंबई

अनधिकृत डंपरची धडक; कल्याण मार्गावर दुचाकीस्वाराचा मृत्यू, सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

CD

डम्परच्या धडकेत
तरुणाचा मृत्यू
टिटवाळा, ता. २४ (वार्ताहर) : कल्याणच्या दिशेने जात असलेल्या अनधिकृत डम्परच्या धडकेत २५ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. वैभव साहेबराव भामरे असे दुचाकीस्वाराचे नाव असून, ही घटना वरप गावाजवळ कल्याण तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी (ता. २४) घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रस्ते सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मालेगावचा रहिवासी असलेला वैभव आजोबांच्या वर्षश्राद्धानिमित्त वरप येथे आला होता. धार्मिक विधी आटोपून तो परतीच्या तयारीत असताना भरधाव डम्परने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. वैभवच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाढत्या बांधकामामुळे अवजड वाहनांची ये-जा वाढली असून, त्यावर प्रभावी नियंत्रणाची गरज असल्याची भावना व्यक्त होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणांनी रस्ते सुरक्षेकडे गांभीर्याने लक्ष देत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
अपघातानंतर काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते. नागरिकांनी मृतदेह तातडीने न हलवता प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पोलिस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि योग्य कारवाईचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानला खरंच T20 World Cup चा गांभीर्य असेल तर...! R Ashwin ने सांगितला विजयाचा मंत्र, इंग्लंडला अडचणीत आणणारी चाल...

जुन्या आठवणी आणि नव्या कथा; मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घरबसल्या पाहा हे ब्लॉकबस्टर मराठी चित्रपट

Latest Marathi News Live Update : बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून अमेरिकन नागरिकांची फसवणूक, पोलिसांनी केला पर्दाफाश

MHT CET Admission : ‘एमएचटी सीईटी’च्या प्रवेश नोंदणीस २७ फेब्रुवारीपर्यंत विलंब शुल्कासह मुदतवाढ

Thane News: मुरबाड नगर पंचायतमध्ये सत्तांतराची नांदी? नगराध्यक्ष संतोष चौधरींची कसोटी; किसन कथोरेंना शह देणारे आता भाजपच्या गोटात

SCROLL FOR NEXT