कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस २३ डब्यांच्या
प्रवाशांना मोठा दिलासा; दोन्ही गाड्यांमध्ये ३-टियर एसी इकॉनॉमीचा एक डबा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोकणकन्या एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेस या लोकप्रिय गाड्यांमध्ये अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे. त्यामुळे सुट्ट्या, सण आणि लग्नसराईच्या काळात कोकणकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही गाड्यांमध्ये ३-टियर एसी इकॉनॉमीचा एक अतिरिक्त डबा कायमस्वरूपी जोडला जाणार आहे. सुधारित रचनेनुसार प्रत्येक गाडीत एक फर्स्ट एसीसह एसी-२ टियर, एक एसी-२ टियर, चार एसी-३ टियर, तीन एसी-३ टियर इकॉनॉमी, सात शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक पॅन्ट्री कार, एक जनरेटर कार आणि एक गार्ड ब्रेक व्हॅन असे एकूण २३ एलएचबी डबे असतील. ट्रेन क्रमांक २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस ही २५ फेब्रुवारीपासून, तर ट्रेन क्रमांक २०११२ मडगाव-सीएसएमटी ही गाडी २४ फेब्रुवारीपासून सुधारित रचनेनुसार धावेल. तसेच ट्रेन क्रमांक १०१०३/१०१०४ मांडवी एक्स्प्रेस २५ फेब्रुवारीपासून नव्या डब्यांसह धावणार आहे. या बदलामुळे गाड्यांची आसनक्षमता वाढणार असून, विशेषतः सुट्ट्या, सण आणि लग्नसराईच्या काळात कोकणकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले, की या गाड्यांच्या वेळापत्रकात किंवा थांब्यांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.