मुंबई

वीज बिल थकवणाऱ्या सव्वा लाख स्मार्ट ग्राहकांची वीज कापली!

CD

सव्वा लाख स्मार्ट ग्राहकांची वीज कापली!
थकीत बिलासाठी रिमोटद्वारे वीजपुरवठा खंडित

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : महावितरणकडून राज्यातील वीज ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवले जात असून, त्याचे इफेक्ट आता दिसू लागले आहेत. महावितरणने पाठवलेले वीजबिल वेळेत न भरलेल्या एक लाख २१ हजार जणांचा रिमोटद्वारे प्रथमच वीजपुरवठा खंडित करून त्यांना शाॅक दिला आहे. त्यामुळे जवळपास ८० हजार ग्राहक खडबडून जागे झाले आहेत. त्यांनी तत्काळ बिल भरले आहे, तर जवळपास ४१ हजार ग्राहकांनी अद्याप बिल न भरल्याने त्यांच्या घरात अंधार असल्याचे समोर आले आहे.
राज्यभरात महावितरणचे सुमारे साडेतीन कोटी वीज ग्राहक असून, त्यामध्ये घरगुती ग्राहकांची संख्या सर्वाधिक आहे. वीज ग्राहकांना त्यांनी वापरलेल्या विजेचे अचूक बिल मिळावे, रियल टाईम वीज वापर समजावा, मीटरमधील छेडछाड सहजपणे समजावी, वीजचोरीला आळा घालता यावा, मीटर रिडिंगची कटकट संपावी म्हणून महावितरणकडून ग्राहकांकडे स्मार्ट मीटर बसवले जात आहेत. त्यानुसार सुमारे ८५ लाख स्मार्ट मीटर बसवले आहेत. संबंधित ग्राहकांना बिलिंग सायकलप्रमाणे कार्यालयात बसून ग्राहकांना वीजबिल पाठवणे शक्य झाले आहे. मात्र जे ग्राहक वीजबिल वेळेत न भरता थकीत ठेवत आहेत त्यांना महावितरणने दणका दिला आहे. नुकताच एक लाख २१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा कार्यालयात बसून खंडित केला होता. त्यामुळे जवळपास ८० हजार ग्राहकांनी तत्काळ वीज बिल भरल्याने तातडीने त्यांचा वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. तर ज्या ग्राहकांनी बिल भरले नाही त्यांचा वीजपुरवठा अद्याप खंडित आहे.

घरोघर झाडाझडती घेणार
महावितरणने वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही जवळपास ४१ हजार ग्राहकांनी अद्याप वीजबिल भरले नाही. त्यांचा वीजपुरवठा बंद आहे. त्यामुळे संबंधित ग्राहक हूक टाकून किंवा शेजाऱ्यांकडून वीज घेत आहेत का, मीटर बायपास करून वीज वापरत आहेत की अंधारातच दिवस काढत आहेत, याबाबतची महिती घेण्यासाठी महावितरणने आपल्या विभागीय कार्यालयांना संबंधितांच्या घरोघरी जाऊन तपासणी करण्याचे आणि त्याबाबतचा अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कामात कुचराई करणाऱ्या अधिकार-कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे कार्यकारी संचालक (वितरण) यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चिंता वाढवणारी बातमी! भारताचा स्टार फलंदाज तातडीने संघाची साथ सोडून घरी परतला; आज सरावालाही नाही आला, कारण...

‘सुपर डुपर’चे उत्सुकता वाढवणारे पोस्टर प्रदर्शित; 'या' तारखेला होणार सिनेमा रिलीज

T20 World Cup Tickets: उपांत्य फेरी, अंतिम फेरीच्या तिकिटांच्या विक्रीला सुरुवात; मुंबईत होणाऱ्या सामन्याचे तिकीट कुठे खरेदी कराल?

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा ‘तिघी’चा ट्रेलर प्रदर्शित

Latest Marathi News Live Update : बहिणीचं शीर धडावेगळं केलं, सख्ख्या भावाकडून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT