मुंबई

राणी बागेत लवकरच गुजरातच्या सिंहची गर्जना

CD

राणीच्या बागेत लवकरच गुजरातच्या सिंहाची गर्जना
महापौर तावडे यांची गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात लवकरच गुजरातच्या सिंहांची गर्जना कानी पडणार आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र लिहून सिंह देण्याची मागणी करणार आहेत, असे पालिका प्रशासनाने सांगितले.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय पर्यटकांचे आकर्षण आहे. पालिकेच्या या उद्यान व प्राणिसंग्रहालयात १५ पेंग्विन, दोन वाघ, शेकडो प्रकारचे पक्षी, हत्ती, हरणे, माकडे, तरस, अजगर आदी प्रकारच्या १३ जातींचे ८४ सस्तन प्राणी, १९ जातींचे १५७ पक्षी आहेत. याशिवाय २५६ प्रजातींचे आणि ६,६११ वृक्ष-वनस्पती आहेत. तसेच रंगीत करकोचा, छत्रबलाक, विविध प्रकारचे बगळे, सारस असे पाणथळ पक्षी आहेत. त्यामुळे बच्चेकंपनीसह मोठ्यांचे ही राणी बाग आकर्षणाचे केंद्र आहे. आता राणी बागेतील प्राणिसंग्रहालयात गुजरातच्या सिंहांची डरकाळी कानी पडणार आहे.
मुंबईच्या महापौर रितू तावडे लवकरच गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र लिहून राणीच्या बागेसाठी सिंहांची मागणी करणार आहेत. गुजरातमध्ये आशियाई सिंहांची संख्या सर्वाधिक असल्यामुळे एक किंवा दोन सिंह मुंबईला देण्याची विनंती या पत्रातून केली जाणार आहे. वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अर्थात राणीच्या बागेत सिंहांसाठी आवश्यक जागा आणि सुविधा उपलब्ध असल्याचे प्राणिसंग्रहालयाकडून सांगण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून राणीच्या बागेत मोठा नवीन प्राणी दाखल झालेला नाही. त्यामुळे पर्यटकांचे आकर्षण वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चिंता वाढवणारी बातमी! भारताचा स्टार फलंदाज तातडीने संघाची साथ सोडून घरी परतला; आज सरावालाही नाही आला, कारण...

‘सुपर डुपर’चे उत्सुकता वाढवणारे पोस्टर प्रदर्शित; 'या' तारखेला होणार सिनेमा रिलीज

T20 World Cup Tickets: उपांत्य फेरी, अंतिम फेरीच्या तिकिटांच्या विक्रीला सुरुवात; मुंबईत होणाऱ्या सामन्याचे तिकीट कुठे खरेदी कराल?

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा ‘तिघी’चा ट्रेलर प्रदर्शित

Latest Marathi News Live Update : शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी होणार -शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर

SCROLL FOR NEXT