आरोग्य शिबिरातून वाढदिवस साजरा
कासा (बातमीदार) ः शिवसेना डहाणू तालुकाप्रमुख हेमंत मेहेर यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान, आरोग्य तपासणी, नेत्रतपासणी शिबिर तसेच मोफत चष्मे वाटप केले. चारोटी येथील महावितरण कार्यालयासमोरील जागेत हा उपक्रम पार पडला. चारोटी गावातील रहिवासी असलेले हेमंत मेहेर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. शालेय व महाविद्यालयीन जीवनापासूनच शिवसेनेशी नाळ जोडली असून बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी पक्षकार्याची वाट धरली. समाजातील गोरगरिबांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी तत्पर राहणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. सामाजिक सेवेतील सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत त्यांना डहाणू तालुकाप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. डहाणू तालुक्यातील विविध प्रश्न तडीस नेण्यासाठी सक्रियपणे कार्यरत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.