मुंबई

तलासरीतील शाळांचा जिल्हास्तरावर गौरव

CD

तलासरीतील शाळांचा जिल्हा स्तरावर गौरव
तलासरी (बातमीदार) ः जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पालघर तसेच शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद पालघरच्या वतीने झालेल्या कार्यक्रमात तलासरी तालुक्यातील विविध शाळांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, प्राचार्य संभाजी भोजने यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला.
झरी धांगडपाडा क्र. २ तसेच जिल्हा परिषद शाळा कवाडा लिलकपाडा शाळेला शिक्षण उपक्रमांतर्गत ‘निपुण महाराष्ट्र सुपर शाळा’ म्हणून विशेष गौरव करण्यात आला. तसेच बा. विनोबा अ‍ॅप पाढे पाठांतर स्पर्धेत इयत्ता चौथी, पाचवी गटात जिल्हा परिषद शाळा कवाडा लिलकपाडा यांनी प्रथम क्रमांक पटकावत तालुक्याचा मान उंचावला. जिल्हा परिषद शाळा वेवजी सोनारपाडा येथील गुणवंत विद्यार्थिनी राधिका वांगडचा बिरसा मुंडा जिल्हा परिषद हॉल येथे जिल्हास्तरीय गुणवंत विद्यार्थिनी म्हणून सन्मान करण्यात आला. तसेच २०२५-२६ मध्ये पंचायत समिती तलासरी अंतर्गत जिल्हास्तरीय विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विधार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

High Court: ब्रेकअप ही सामान्य बाब; प्रेमसंबंध तुटणे म्हणजे आत्महत्येला प्रवृत्त करणे नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

Maharashtra Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा जीआर; पगार वाढला, फरकही मिळणार

कधीकधी भीती वाटते... 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीने घेतलाय लग्नाचा निर्णय; कारण सांगत म्हणाली- आई-बाबा बीडला...

Mumbai Police Arrest 25 Bangladeshis : मुंबई पोलिसांनी सापळा रचून २५ बांगलादेशींना केली अटक ; बनावट कागदपत्रेही जप्त

SCROLL FOR NEXT