मुंबई

मुरबाड बसस्थानकावरील दागिने चोरीचा उलगडा

CD

मुरबाड बस स्थानकावरील दागिने चोरीचा उलगडा; महिलेला अटक
* स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी
सकाळ वृत्तसेवा

ठाणे, ता. २५ : मुरबाड बस स्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत महिलेकडील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या भांडुप येथील लक्ष्मी किसन जाधव या महिलेला ठाणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तसेच चोरीस गेलेले सुमारे नऊ तोळे १.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्या महिलेकडून हस्तगत करण्यात आले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २१ डिसेंबर २०२४ रोजी तक्रारदार सारीखा संजय घुडे या मुरबाड बस स्थानकावरून आपल्या मूळगावी उंबरपाडा येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करत होत्या. सायंकाळी सुमारे ५.३० वाजता सरळगावकडे जाणारी बस लागल्यानंतर गर्दीत बसमध्ये चढताना अनोळखी चोरट्याने त्यांच्या पर्सची चेन उघडून पर्समधील सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला होता. याप्रकरणी मुरबाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालमत्तेविषयक गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे ग्रामीण पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप गिते यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करून कोणताही ठोस धागादोरा नसताना गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे लक्ष्मी जाधव या महिलेला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्या महिलेने गुन्ह्याची कबुली दिली असून, तिच्याकडून चोरीस गेलेले नऊ तोळे १.५ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सोनवणे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: यवतमाळमध्ये कडक उन्हामुळे शेतातील डिस्ट्रिब्युशन बॉक्सने घेतला पेट

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT