नवघरमध्ये शंभर खाटांचे रुग्णालय
राजाराम बाबर यांच्या पाठपुराव्याला यश
विरार, ता. २५ (बातमीदार) ः नवघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्वे क्रमांक ५८ वर शंभर खाटांचे सहा मजली रुग्णालय विविध कारणांनी रखडले होते; पण अखेर त्याला यश आले असून रुग्णालय उभारणीला वेग आला आहे.
ठाकरे गटाचे राजाराम बाबर यांनी विविध मान्यवरांशी भेटी घेऊन तसेच लेखी पत्रव्यवहार करून शासनदरबारी रुग्णालयासाठी पाठपुरावा केला होता. तसेच पालकमंत्री गणेश नाईक, आमदार स्नेहा दुबे, माजी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी खासदार राजेंद्र गावीत, तसेच पालिका आयुक्त यांच्याशी भेट घेऊन रुग्णालयाच्या उभारणीबाबत सकारात्मक चर्चा केली होती. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता संजय यादव यांनी प्रकल्पाबाबत चौकशी करून रीतसर पत्र दिले आहे. त्यामुळे शंभर खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभारण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.