मुंबई

शिरोळकर हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा

CD

शिरोळकर हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
विदेशातूनही उपस्थिती; भूषण गवईंसह १९७६ची बॅच एकत्र
प्रभादेवी, ता. २५ : गिरगाव येथील चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलच्या १९७६च्या बॅचचे स्नेहसंमेलन शाळेच्या वागळे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले. वयोमानामुळे प्रत्यक्ष उपस्थित राहता न आल्याने शिक्षकांनी चलचित्राद्वारे माजी विद्यार्थ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यामुळे कार्यक्रमाला भावनिक स्पर्श लाभला.
या बॅचचे माजी विद्यार्थी तसेच भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली. इस्रायल, युरोप, अमेरिका आदी देशांतूनही अनेक माजी विद्यार्थी खास या स्नेहसंमेलनासाठी आले होते.
त्या काळातील शाळेसमोरील ‘हरीचे दुकान’ हे विद्यार्थ्यांचे आवडते ठिकाण होते. चिंचा, बोरे, आवळा, बडीशेप आणि लिंबाच्या गोळ्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी वागळे सभागृहाबाहेर तसाच स्टॉल उभारण्यात आला होता. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळत वातावरण आनंदमय झाले.
गतवर्षी २७ फेब्रुवारी रोजी शाळेने साकारलेल्या जागतिक १००० गाण्यांच्या उपक्रमाची इंडिया बूक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली होती. तसेच विद्यार्थ्यांना साहित्यिक व कवी म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या ‘अजब गजब’ या त्रैमासिक उपक्रमाची माहिती देण्यात आली. यंदाच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘संत साहित्य हा मराठी भाषेचा भक्कम पाया’ या विषयावर होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषाही मांडण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अवधूत गोखले, अविनाश पाठक, नितीन आंबर्डेकर यांनी विशेष परिश्रम घेतले. विनायक जोशी यांनी शाळेच्या इतिहासावर आधारित आकर्षक ध्वनिचित्रफीत सादर केली, तर जोस्ना म्हात्रे, माधुरी गोखले, सुबोध पालकर, मोहन नारकर, राजीव गोविलकर आणि संजय होनाळे यांनी करमणूक कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.

म्युझिक सिस्टीम भेट
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला अत्याधुनिक म्युझिक सिस्टीम भेट देण्यात आली. मुख्याध्यापिका संचिता गावडे यांच्या हस्ते तिचे उद्घाटन करण्यात आले. तसेच माजी विद्यार्थ्यांनी जमविलेला एक लाख ७५ हजार रुपयांचा धनादेश चिकित्सक समूहाचे सचिव डॉ. गुरुनाथ पंडित यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. हा निधी बँकेत कायमस्वरूपी ठेव स्वरूपात ठेवून त्यावरील व्याजातून आणि चिकित्सक समूहातर्फे तेवढ्याच समभागातून दरवर्षी २४ नोव्हेंबर रोजी एका होतकरू विद्यार्थी व विद्यार्थिनीचा गौरव करण्यात येईल, अशी घोषणा डॉ. पंडित यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar Wedding : गणपती बाप्पाचा आशीर्वाद! अर्जुन-सानियाच्या लग्नासाठी तेंडुलकर कुटूंब पोहोचले 'खास' ठिकाणी; सचिन म्हणाला, जेव्हा मुलगा एका मुलीला घरी घेऊन येतो तेव्हा...

Romance Scam : ऑनलाइन प्रेम की गोड विष? 'I Love You' म्हणून रिकामं करत आहेत बँक अकाऊंट; रोमॅन्स स्कॅमचं 'ते' सत्य तुम्हाला रडवून टाकेल

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

T20 WC, IND vs ZIM: संजू सॅमसन, अक्षर पटेलचं पुनरागमन होणार, पण मग कोणाला मिळणार डच्चू? अशी असेल भारताची Playing XI

SCROLL FOR NEXT