मुंबई

वाड्यात शास्त्रज्ञ, शेतकऱ्यांच्या गप्पागोष्टी

CD

वाड्यात शास्त्रज्ञ, शेतकऱ्यांच्या गप्पागोष्टी
आंब्याच्या बागेत ड्रोनद्वारे औषध फवारणीचे प्रात्यक्षिक
वाणगाव, ता. २५ (बातमीदार) : शेतीमध्ये मजुरांची टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. या अडचणीतून मात करण्यासाठी यांत्रिकीकरण हाच पर्याय असल्याचे प्रतिपादन वाडा येथील शेतकरी अनिल पाटील यांनी आत्मा अंतर्गत किसान गप्पागोष्टी कार्यक्रमात केले आहे.
ग्रामीण विकास ट्रस्ट यांच्यामार्फत ड्रोनद्वारे औषध फवारणीचे प्रात्यक्षिकही आंब्याच्या बागेत करण्यात आले. तसेच वैतरणा पाणलोट क्षेत्र विकास शेतकरी उत्पादक कंपनी ऐनशेतचे संचालक यांनी त्यांच्यामार्फत राबविलेले उपक्रम व प्रस्तावित प्रक्रिया युनिटबाबत माहिती दिली. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन संस्था आत्मा पालघर व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने वाडा तालुक्यातील मौजे ठाकरे पाडा (गांध्रे) व नाणे येथे किसान गप्पागोष्टी कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमाला वाडा उपविभागाचे तंत्र अधिकारी गावडे, तालुका कृषी अधिकारी माकर, मंडळ कृषी अधिकारी कुंडले, कृषिरत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी अनिल पाटील, राजू संखे, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक बांगर आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: यवतमाळमध्ये कडक उन्हामुळे शेतातील डिस्ट्रिब्युशन बॉक्सने घेतला पेट

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT