ऑल इंडिया एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सुटला
२० मार्चपर्यंत पालिकेच्या शाळेत वर्ग उपलब्ध होणार
घाटकोपर, ता. २५ (बातमीदार) ः असल्फा पाइपलाइन येथील ऑल इंडिया एज्युकेशन सोसायटी हायस्कूलच्या इमारतीचे नूतनीकरण सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झाला होता. मात्र शिवसेना नगरसेवक किरण लांडगे यांच्या पाठपुराव्यामुळे आता या विद्यार्थ्यांची सोय असल्फा म्युनिसिपल शाळेत होणार आहे. येत्या २० मार्चपर्यंत या ठिकाणी आठ वर्ग उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन शिक्षण विभागाने दिले आहे.
पालकांच्या तक्रारीची दखल घेत नगरसेवक किरण लांडगे यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष शिष्टमंडळाने मुंबई महापालिकेचे उपमहापौर संजय घाडी यांच्या दालनात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीला मुंबई विभागाचे शिक्षण अधिकारी एम. एस. राव, एल विभाग शिक्षण अधिकारी डिसिल्वा, मुख्याध्यापिका प्रीती, सामाजिक कार्यकर्त्या ज्योती मोहिते, पालकांच्या वतीने प्रतिनिधी म्हणून अर्जुन घोलप, अश्विनी बोलके-डावखर हेदेखील उपस्थित होते.
किरण लांडगे यांनी पालकांच्या वतीने असल्फा म्युनिसिपल शाळेत १० ते १२ वर्ग अल्प दरात उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली. यावर सकारात्मक चर्चा होऊन शिक्षण अधिकाऱ्यांनी २० मार्चपर्यंत आठ वर्ग तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यामुळे १,२२८ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि सुरक्षेचा मार्ग मोकळा झाला असून, पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
नेमकी अडचण काय होती?
शाळेचे नूतनीकरण सुरू झाल्यामुळे तब्बल १,२२८ विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी जागा शोधण्यात आली होती. मात्र ती जागा अत्यंत गलिच्छ परिसरात आणि लहान मुलामुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने असुरक्षित होती. पालकांनी याबाबात किरण लांडगे यांच्याकडे तक्रारी करीत आपल्या मुलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.