मुंबई

महसूल सेवा आता गावातच!

CD

मुरबाड, ता. २५ (वार्ताहर) : तहसील कार्यालय, मुरबाडमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)’ अंतर्गत प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर विशेष शिबिरे घेण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अभिजित देशमुख व नायब तहसीलदार अमोल शिंदे यांनी दिली. समाधान शिबिरांना ७ मार्चपासून सुरुवात होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व महिलांना महसूल विभागातील १५ महत्त्वांच्या सेवा एकाच दिवशी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अभियानांतर्गत राज्यातील सर्व महसूल मंडळ; तसेच नगर परिषद व नगर पंचायत स्तरावर समाधान शिबिरे घेतली जाणार आहेत. मंडळ स्तरावरील पूर्वतयारी १८ फेब्रुवारी ते ५ मार्चदरम्यान केली जाणार आहे. ७ मार्च (शनिवार), १४ मार्च (शनिवार), १० एप्रिल (शुक्रवार), १७ एप्रिल (शुक्रवार), तर मे महिन्यात नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर ८ मे (शुक्रवार) व १५ मे (शुक्रवार) रोजी शिबिरे पार पडणार आहेत.

शिबिरांमधील कामे
शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ उताऱ्यातील दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ उतारे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर दाखले, अकृषिक परवानगी, ‘सनद’ प्रक्रियेचे मार्गदर्शन, सामाजिक अर्थसाह्य योजनांचे लाभ, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक दाखले, तुकडेबंदी उल्लंघन प्रकरणांचा निपटारा, घरपट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, ॲग्रीस्टॅक व पीएम किसान नोंदणी, तसेच भूसंपादन व अकृषिक प्रकरणी ‘कमी-जास्त पत्रके’ तयार करून गाव दप्तर अद्ययावत करण्याची कामे केली जाणार आहेत.

नागरिकांना आवाहन
तहसीलदार अभिजित देशमुख यांनी नागरिकांना संबंधित तारखांना आपल्या मंडळ मुख्यालयी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. लोकांना त्यांच्या गावातच त्वरित, पारदर्शक आणि सुलभ सेवा उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांकनिहाय कॅम्प घेण्यात आले असून, जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नायब तहसीलदार अमोल शिंदे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: महाराष्ट्रात टॅक्सी-ऑटो चालकांना मराठी बोलणे अनिवार्य! प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा; प्रवाशांशी मराठीत संवाद साधण्याचे आदेश

अखेर भूषण प्रधानची स्वप्नसुंदरी समोर आलीच! कोण आहे ती? खास पोस्ट करत दाखवला चेहरा

Danoli Village Shutdown Protest : “भरतेशला न्याय मिळालाच पाहिजे”, दानोळी गाव बेमुदत बंद; जिवाभावाचा भरतेश गेला भविष्य सुरक्षितेसाठी गाव एकवटलं

छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहगर्जना घुमणार... ‘राजा शिवाजी’ सिनेमाचं पहिलं गाणं प्रदर्शित!

Pune Crime: पिंपरीत आंब्याच्या आमिषाने अडीच वर्षांच्या चिमुरडीला खोलीत बोलावून लैंगिक अत्याचार; ४७ वर्षीय आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT