मुंबई

साकीनाका ९० फूट रस्त्याच्या दुभाजकावर कचऱ्याचा विळखा

CD

साकीनाका ९० फूट रस्त्याच्या दुभाजकावर कचऱ्याचा विळखा
घाटकोपर, ता. २५ (बातमीदार) : साकीनाका मेट्रो स्थानक परिसरातील ९० फूट रस्त्याच्या दुभाजकावर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्लॅस्टिक पिशव्या, अन्नाचा उरलेला कचरा, बांधकाम मलबा आणि घरगुती कचऱ्याचे ढीग दुभाजकावर दिसत आहेत. गजबजलेल्या या मार्गाचे सौंदर्यीकरणासाठी बांधलेले दुभाजकच आता कचरा टाकण्याचे ठिकाण बनले आहे. दुर्गंधीमुळे डास, माश्या व भटक्या प्राण्यांचा वावर वाढला असून, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “स्वच्छतेच्या घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात परिस्थिती बिकट आहे. नाकावर रुमाल लावून मार्ग काढावा लागतो,” अशी प्रतिक्रिया रिक्षाचालक हनुमंत टाव्हरे यांनी दिली. संबंधित महापालिका विभागाने तत्काळ दखल घेऊन कचरा हटवावा व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. एल विभागाच्या घनकचरा विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला; मात्र प्रतिसाद मिळू शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT