मुंबई

बीपीएमसी कायद्यानुसार कर व दर निश्चित करण्यासाठी तातडीने महासभा बोलवा

CD

कर व दर निश्चितीसाठी तातडीने महासभा घ्या
नगरसेवक दीपेश म्हात्रे यांची महापौरांकडे मागणी
कल्याण, ता. २५ (वार्ताहर) : नगरसेवक आणि महापौर निवडीनंतरही अद्याप महासभा झाली नसल्याने नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. बीपीएमसी कायद्यानुसार कर व दर निश्चित करण्यासाठी तातडीने महासभा बोलवण्याची मागणी दीपेश म्हात्रे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी कल्याण-डोंबिवली पालिकेच्या महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेचे १२२ नगरसेवक निवडीनंतर हर्षाली चौधरी यांची महापौरपदी नियुक्ती झाली आहे. बीपीएमसी कायद्यांमधील तरतुदीनुसार महापालिकेचे कर व दर हे २० फेब्रुवारीपूर्वी निश्चित करणे अत्यावश्यक आहे. मात्र, आजपर्यंत यासंदर्भात कोणतीही महासभा घेण्यात आलेली नाही, असे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.
महासभा ही लोकशाही व्यवस्थेतील सर्वोच्च निर्णयप्रक्रिया असून, तिच्यामार्फतच कर व दर निश्चित होणे अपेक्षित आहे. यामध्ये विलंब होणे हे नागरिकांच्या हिताच्या दृष्टीनेही योग्य नाही. त्यामुळे तातडीने महासभा बोलवून कर व दर निश्चित करण्याचा विषय मांडावा. महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात. निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांना त्यांच्या अधिकारानुसार निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यात यावे, अशी मागणी दीपेश म्हात्रे यांनी महापौरांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Budget: मोफत स्टेशनरी, पदवीपर्यंत फी भरण्याची तरतूद अन्...; बीएमसीचा ₹४,२४८ कोटींचा शिक्षण अर्थसंकल्प सादर, योजना काय आहेत?

Maharashtra Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा जीआर; पगार वाढला, फरकही मिळणार

कधीकधी भीती वाटते... 'आई कुठे काय करते' फेम गौरी कुलकर्णीने घेतलाय लग्नाचा निर्णय; कारण सांगत म्हणाली- आई-बाबा बीडला...

Mumbai Police Arrest 25 Bangladeshis : मुंबई पोलिसांनी सापळा रचून २५ बांगलादेशींना केली अटक ; बनावट कागदपत्रेही जप्त

Viral Video : हेलिपॅड, 100 एकरची जागा आणि भव्य फार्महाऊस ; कोई मिल गया फेम खलनायकाची प्रॉपर्टी पाहून येईल चक्कर !

SCROLL FOR NEXT