मुंबई

परप्रांतीय मच्छी विक्रेत्यांमुळे स्थानिक मच्छी विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात

CD

अनधिकृत मच्छीविक्रीविरोधात कोळी महासंघ आक्रमक
कल्याण, ता. २५ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनधिकृतपणे सुरू असलेल्या परप्रांतीय मच्छीविक्री व्यवसायामुळे स्थानिक कोळी समाजाच्या उपजीविकेवर गदा आली आहे. या अनिधिकृ मच्छीमारांविरोधात तत्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाकडून महापौरांकडे करत निवेदन दिले आहे.
या वेळी कोळी महासंघाचे राज्यनेते देवानंद भोईर, खानदेश विभागप्रमुख सुभाष कोळी, ठाणे ग्रामीण अध्यक्ष रवींद्र भंडारी, तालुका अध्यक्ष दशरथ पाटील, महिला तालुकाध्यक्ष वर्षा कोनकर, शहाड अध्यक्ष कैलास ढोणे, कार्याध्यक्ष बाबू ढोणे, संपर्कप्रमुख सुनील जाधव, चिटणीस चंद्रकांत मढवी, नीलम कशेळीकर, गणेश भोईर, कुमार गुरु यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कल्याण परिसरात काही संशयित परदेशी व्यक्तींमार्फत अनधिकृतरीत्या मच्छीविक्री केली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. कल्याण स्थानक परिसर, गोविंदवाडी ब्रिज चौक, चिकणघर परिसर आणि शहरातील विविध गल्लीबोळांमध्ये डोक्यावर टोपल्या घेऊन दारोदारी मच्छीविक्री होत असल्याचे शिष्टमंडळाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. विक्रीस ठेवली जाणारी मच्छी अनेकदा अस्वच्छ व सडलेल्या अवस्थेत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता महासंघाने व्यक्त केली आहे. संबंधित विक्रेत्यांची ओळख व कागदपत्रांची पडताळणी करून अनधिकृत व्यवसायावर तत्काळ कारवाई करावी अन्यथा स्थानिक कोळी समाज आंदोलन छेडण्याचा इशाराही महासंघाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

Illegal Cattle : कुपवाडमध्ये कत्तलीसाठी जनावरांची अमानुष वाहतूक; पोलिसांची धडक कारवाई, पाच जणांवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या वणीत आलिशान दुमजली घरात बनावटी दारू कारखाना,राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

मी खचले होते... 'कमळी' मधील अन्नपूर्णा आजींवर एका कारणामुळे झालेली टीका; म्हणाल्या, 'माझ्यात कमी...'

SCROLL FOR NEXT