मुंबई

गांधारी रिंगरोडवरील भरधाव वाहनांवर कारवाई करण्याची शिवसेनेची मागणी

CD

रिंगरोडवर भरधाव वाहनांचा धोका
कारवाईसाठी शिवसेनेची मागणी; वाहतूक पोलिसांकडून तपासणी मोहीम सुरू
कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील गांधारी वडवली रिंगरोड येथे वाहनचालक अतिवेगाने वाहने चालवत असल्याने वारंवार अपघाताच्या घटना घडतात. या अपघातांना कारणीभूत असलेल्या भरधाव वाहनांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना विभाग उपप्रमुख कुणाल कुलकर्णी यांनी वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांना पत्र दिले आहे.
गांधारी वडवली रिंगरोड हा रस्ता पूर्णत्वास आलेला नाही. तरी या रस्त्यावर दिवसा व रात्रीच्या वेळी भरधाव दुचाकीस्वार व वाहनचालक रेसिंग लावून इतर नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहेत. नुकताच काही दिवसांपूर्वी याठिकाणी अपघात होऊन एक जण गंभीर जखमी झाला होता. भरधाव वाहनांच्या वेगामुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी स्पीडगन, दुभाजक, गतिरोधक लावून ठोस कारवाई करण्याची मागणी कुणाल कुलकर्णी यांनी केली आहे. दरम्यान, कुलकर्णी यांच्या पत्रानंतर वाहतूक पोलिस सतर्क झाले असून रिंगरोडवर बंदोबस्त लावून वाहनचालकांची तपासणी करत कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा जीआर; पगार वाढला, फरकही मिळणार

Arjun Tendulkar Wedding : गणपती बाप्पाचा आशीर्वाद! अर्जुन-सानियाच्या लग्नासाठी तेंडुलकर कुटूंब पोहोचले 'खास' ठिकाणी; सचिन म्हणाला, जेव्हा मुलगा एका मुलीला घरी घेऊन येतो तेव्हा...

Holi Thandai Recipe: होळीला पाहुण्यांची मनं जिंकायची आहेत? मिनिटांत तयार करा 'थंडाई' पिताच सगळे म्हणतील ‘अरे वा!’, जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी विधिमंडळात उपस्थित केला PM किसान, नमो शेतकरी योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा मुद्दा

Igatpuri News : बेरोजगारीवर मात! इगतपुरीतील तरुण पिढीचा दुग्धव्यवसायाकडे वाढता कल; रोज १ लाख लिटर संकलन

SCROLL FOR NEXT