पशुविकास दिनातून १.५५ लाख जणांना लाभ
प्रभादेवी, ता. २५ : एसएमएफजी इंडिया क्रेडिटने आयोजित केलेल्या आठव्या पशुविकास दिन (पीव्हीडी) उपक्रमातून देशभरातील १.५५ लाखांहून अधिक ग्रामीण जीवनावर सकारात्मक प्रभाव साधण्यात आला. या उपक्रमांतर्गत सुमारे १.४ लाख गुरांवर उपचार करण्यात आले, तर १४ हजारांहून अधिक ग्रामस्थांना आरोग्यसेवा सहाय्य देण्यात आले. परिणामी, ३० हजारांपेक्षा अधिक कुटुंबांना थेट लाभ मिळाला.
‘सर्वोत्तम सेवा: पशु, परिवार आणि प्रगती’ या संकल्पनेवर आधारित या उपक्रमाने पशुधनाचे आरोग्य, कुटुंबांचे कल्याण आणि शाश्वत ग्रामीण प्रगती यांना चालना दिली. २०१४ मध्ये सुरू झालेला हा उपक्रम पशुपालन करणाऱ्या नागरिकांच्या अत्यावश्यक गरजांवर लक्ष केंद्रित करत मोफत पशुवैद्यकीय सेवा आणि तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध करून देतो. महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम ५९ ठिकाणी राबविण्यात आला. त्यातून १९ हजारांहून अधिक जनावरांना आरोग्यसेवा पुरविण्यात आली आणि पाच हजार २०० पेक्षा अधिक कुटुंबांना लाभ झाला. प्रत्येक शिबिरात स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून मोफत तपासणी, औषधांचे वितरण, लसीकरण तसेच दूध देणाऱ्या गुरांचे उत्पादन वाढविण्याबाबत मार्गदर्शन देण्यात आले. ग्रामीण भारतात पशुधनाचे आरोग्य, कुटुंबांची सुरक्षितता आणि आर्थिक प्रगती या परस्परांशी निगडित असल्याचे सांगत कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवि नारायणन यांनी या उपक्रमाद्वारे ग्रामीण परिसंस्थेला बळकटी देण्याचा संस्थेचा उद्देश असल्याचे स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.