मुंबई

‘वर्ल्ड ऑफ स्लीप’चा अनोखा अनुभव

CD

प्रभादेवीत ‘वर्ल्ड ऑफ स्लीप’ची घोषणा
आरोग्यदायी जीवनशैलीसाठी झोप तंत्रज्ञान, उत्पादने व तज्ज्ञ मार्गदर्शन एकाच छताखाली

प्रभादेवी, ता. २५ : झोप ही केवळ जैविक गरज नसून आरोग्यदायी जीवनशैलीचा महत्त्वाचा भाग बनत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘वर्ल्ड ऑफ स्लीप’ या समग्र अनुभव देणाऱ्या व्यासपीठाची घोषणा करण्यात आली आहे. टेक्सझॉनच्या वतीने प्रभादेवी येथील राजन हाऊस येथे आयोजित कार्यक्रमात याबाबत माहिती देण्यात आली.
चांगली आणि व्यवस्थित झोप आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत करते, या तत्त्वावर आधारित ‘वर्ल्ड ऑफ स्लीप’ नागरिकांना उत्कृष्ट झोपेच्या शोधासाठी एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. टेक्सझॉनच्या माध्यमातून परिपूर्ण झोपेसाठी आवश्यक नावीन्यपूर्ण उत्पादने, सेवा, साधने आणि माहिती यांचे दालन नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात विविध गाद्या व उशांचे ब्रँड्स, उत्पादक, झोप तज्ज्ञ, डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र येणार आहेत. पाचही इंद्रियांद्वारे झोप सुधारण्यासाठी अनुभवात्मक सादरीकरणे आयोजित केली जाणार असून ग्राहकांना त्यांच्या झोपेतील घटक सानुकूल करण्याची संधी मिळणार आहे. तसेच संभाव्य झोप विकारांविषयी सखोल माहिती, मार्गदर्शन आणि झोप सुधारण्यासाठी आधुनिक उपाय एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT