मुंबई

समता विद्या मंदिर शाळेचे यश

CD

शिष्यवृत्तीत समता विद्यामंदिर शाळेचे यश

घाटकोपर, ता. २५ (बातमीदार) : इयत्ता आठवीसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत राष्ट्रीय साधन-सह-गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना (एन.एम.एम.एस.) परीक्षा २०२५-२६ चा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये साकीनाका येथील समता विद्यामंदिर शाळेने उल्लेखनीय यश संपादन करत आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
या परीक्षेसाठी शाळेतील इयत्ता आठवीचे एकूण पाच विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तब्बल चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शाळेचा निकाल ८० टक्के लागला आहे. हा निकाल शाळेसाठी अत्यंत अभिमानास्पद मानला जात आहे. या परीक्षेत श्रावणी गणेश संकपाळ, जयेश दीपक कुचेकर , कुणाल अजय शिंदे आणि स्वप्निल अशोक छापछडे यांनी यश संपादन केले आहे. या यशामागे शाळेच्या मुख्याध्यापिका भारती पोवळे यांचे परिश्रमपूर्वक मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरले आहे. तसेच समता शिक्षण संस्थेचे सचिव राजेश सुभेदार यांचे सततचे मार्गदर्शन व प्रेरणा यामुळे हे यश शक्य झाले, अशी भावना शाळा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT