मुंबई

कबड्डी स्पर्धेत 42 संघांचा सहभाग

CD

कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पालघर, ता. २५ : पालघर तालुक्यातील धुकटण येथे जिल्हास्तरीय कबड्डीच्या स्पर्धा पार पडल्या. ग्रामीण भागात पार पडलेल्या मॅटवरच्या या स्पर्धेने कबड्डीपटूंना प्रोत्साहन मिळेल, अशा आयोजनातून नवीन खेळाडूंना चांगली संधी प्राप्त झाल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी केले. जाणता राजा सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. स्पर्धांचे उद्घाटन गावच्या सरपंच प्रतिभा भोईर व ग्रामपंचायत सदस्य, अलका विनोद पाटील आदींच्या उपस्थितीत पार पडले.
जिल्हास्तरीय असलेल्या या कबड्डी स्पर्धेत पालघर जिल्हा असोसिएशन निमंत्रित ३२ पुरुष व १० महिला संघांनी सहभाग घेतला. पुरुष गटात झालेल्या अंतिम सामन्यात नालासोपारा इच्छाशक्ती संघ आणि आर. ए. चहाडे यांच्यात रंगतदार सामना झाला. शेवटच्या क्षणी इच्छाशक्ती संघाने खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर विजेतेपद पटकावले. तर महिला गटात कुर्लाई सफाळे आणि विरारच्या श्रीराम संघात अटीतटीची लढत झाली. यामध्ये श्रीराम संघाला विजय प्राप्त होऊन त्यांनी विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. विजेते आणि उपविजेत्या संघाला रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देण्यात आले. बक्षीस वितरण बोईसर विधानसभेचे आमदार विलास तरे, प्रवीण राऊत यांच्या हस्ते केले गेले. माजी आमदार राजेश पाटील, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राघव देशमुख, सचिव प्रसाद भोईर, भरत राजपूत, वसंत चव्हाण आदी या वेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Government Employees: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शासनाचा जीआर; पगार वाढला, फरकही मिळणार

Arjun Tendulkar Wedding : गणपती बाप्पाचा आशीर्वाद! अर्जुन-सानियाच्या लग्नासाठी तेंडुलकर कुटूंब पोहोचले 'खास' ठिकाणी; सचिन म्हणाला, जेव्हा मुलगा एका मुलीला घरी घेऊन येतो तेव्हा...

Holi Thandai Recipe: होळीला पाहुण्यांची मनं जिंकायची आहेत? मिनिटांत तयार करा 'थंडाई' पिताच सगळे म्हणतील ‘अरे वा!’, जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी विधिमंडळात उपस्थित केला PM किसान, नमो शेतकरी योजनेतील पात्र लाभार्थ्यांचा मुद्दा

Igatpuri News : बेरोजगारीवर मात! इगतपुरीतील तरुण पिढीचा दुग्धव्यवसायाकडे वाढता कल; रोज १ लाख लिटर संकलन

SCROLL FOR NEXT