उल्हासनगर, ता. २५ (वार्ताहर) : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या प्रलंबित प्रश्नांना राज्यव्यापी व्यासपीठ मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ईम्प्लॉइज जनरल युनियन या नव्या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. संघटनेच्या स्थापनेची अधिकृत घोषणा करताना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष चरणसिंह टाक, उपाध्यक्ष विनोद केणे आणि सचिव नीलम कदम यांनी ही माहिती दिली.
राज्यभरातील महापालिका, नगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा अटी, पदोन्नती, वेतनवाढ, बदली, प्रशासकीय दडपण, तसेच विविध प्रलंबित प्रश्नांचा सामना करावा लागत आहे. या सर्व समस्यांचे संघटित पद्धतीने निराकरण व्हावे आणि कर्मचाऱ्यांना न्याय्य हक्क मिळावेत, यासाठी ही संघटना कार्य करणार असल्याचे टाक यांनी स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या प्रश्नांवर ठोस तोडगा काढणे हेच आमचे ध्येय आहे, असे ते म्हणाले.
लवकरच पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
उपाध्यक्ष विनोद केणे यांनी, संपूर्ण महाराष्ट्रातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्कांसाठी संघटना ठामपणे उभी राहील. कर्मचाऱ्यांचे हित, सन्मान आणि कल्याण हेच आमचे मुख्य ध्येय आहे. संघटना कोणत्याही अन्यायाविरुद्ध लढा देईल, असे नमूद केले. या सोबतच लवकरच राज्यातील सर्व महापालिका व नगर परिषदांमध्ये, तसेच उल्हासनगर महापालिकेत संघटनेची युनिट स्थापन करून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहितीही दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.