उरण येथे व्यसनमुक्ती जनजागृती अभियान
उरण, ता. २४ (वार्ताहर) : जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण आणि ब्रह्माकुमारीज यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरात व्यसनमुक्तीबाबत जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली. समाजात वाढत्या व्यसनाधीनतेच्या पार्श्वभूमीवर निरोगी व सुसंस्कृत जीवनशैलीचा संदेश देणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
अभियानांतर्गत विशेष संदेशरथ ध्वजवंदन करून रवाना करण्यात आला. या रथाद्वारे जेएनपीए परिसरातील गावे, वसाहती व सार्वजनिक ठिकाणी जाऊन व्यसनाचे दुष्परिणाम, कुटुंबव्यवस्थेवरील परिणाम तसेच मानसिक व शारीरिक आरोग्यावरील घातक प्रभाव याबाबत नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.
महाव्यवस्थापक (प्रशासन) व सचिव मनीषा जाधव यांच्या हस्ते संदेशरथाला हिरवा कंदील देण्यात आला. यावेळी जेएनपीएचे अधिकारी-कर्मचारी व ब्रह्माकुमारीजचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चौकट
युवकांवर विशेष भर
अभियानात युवकांमध्ये मूल्यसंस्कार रुजवणे, सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार घडवणे आणि समुपदेशन-आध्यात्मिक साधनेच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश पोहोचवणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे. त्यामुळे व्यसनमुक्त, निरोगी व सशक्त समाज घडण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.