मुंबई

परराज्यातील मद्य तलासरीतून जप्त

CD

परराज्यातील मद्य तलासरीतून जप्त
८.६८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
कासा, ता. २५(बातमीदार)ः परराज्यातील अवैध मद्यविक्रीचा प्रयत्न डहाणू येथील उत्पादन शुल्क निरीक्षक, पालघर भरारी पथकाने सापळा रचून उघडकीस आणला आहे. या प्रकरणात आठ लाख ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
डहाणू उत्पादन शुल्क विभाग, पालघर भरारी पथकाने डॉगारी पाटीलपाडा येथे पांढऱ्या रंगाची चारचाकी थांबवून तपासणी केली होती. या वाहनामध्ये परराज्यातील विदेशी मद्याचे १८ बॉक्स आढळून आले. दादरा नगर हवेली येथे विक्रीसाठी हे मद्य नेले जात असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. या कारवाईत सात लाखांची कार तसेच एक लाख ६८ हजार ३६० रुपये किमतीचे मद्य असा आठ लाख ६८ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक राजेश शिंदे करीत आहेत.
-------------------------------
पथकाची चोख कामगिरी
परराज्यातील मद्यविक्रीला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाची संयुक्त कारवाई सुरू आहे. त्यानुसार आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त प्रदीप पवार, अधीक्षक गणेश बारगजे, उपअधीक्षक अविनाश रणपीसे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनील देशमुख, भरारी पथकाचे निरीक्षक अरुण चव्हाण, दुय्यम निरीक्षक राजेश शिंदे, विश्वजीत आभाळे, अभिजित मानकर सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकचे शतक, मोडला MS Dhoni चा विक्रम! युझवेंद्र चहलची एक चूक अन् पंजाब किंग्सच्या मेहनतीवर पाणी

Priyanka Gandhi : "चाणक्य आज जिवंत असते तर त्यांना धक्काच बसला असता..." प्रियंका गांधींची अमित शाह यांच्यावर टीका, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाजपवर गंभीर आरोप

MI vs PBKS Live: खतरनाक थ्रो! श्रेयस अय्यरने 'चेंडू' वेगाने फेकला, पंजाबच्या खेळाडूच्या डोक्यावर आदळला... सोडावं लागलं मैदान

Congress Row : काँग्रेसचे टेन्शन वाढलं ! राज्यातील बडा नेता नाराज, थेट पक्ष सोडण्याचा दिला इशारा

SCROLL FOR NEXT