मुंबई

अंबरनाथमध्ये बनावट कॉल सेंटरचा भांडाफोड; अमेरिकन नागरिकांची बिटकॉइनद्वारे फसवणूक !

CD

बनावट कॉल सेंटरवर छापा
अमेरिकन नागरिकांची बिटकॉइनद्वारे फसवणूक

अंबरनाथ, ता. २५ (वार्ताहर) ः संकेतस्थळ निर्मिती करून देण्याचे प्रलोभन दाखवून अमेरिकन नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अंबरनाथमध्ये मंगळवारी (ता. २४) उघडकीस आला आहे. एका कॉल सेंटरमध्ये हा प्रकार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून मालकासह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, पुढील तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.
अंबरनाथ पश्चिम येथील कल्याण-बदलापूर रोडवरील ग्लोब बिझनेस पार्कमध्ये सुरू असलेल्या एका बनावट कॉल सेंटरचा अंबरनाथ पोलिस ठाण्याच्या पथकाने मंगळवारी (ता. २४) रात्री धाड टाकून पर्दाफाश केला. सेंटर मालक कमलेश सुनील सचवाणी (३५), यांच्यासह हरेश केवलाणी (२२), यश राजू पाटील (२४), हितेश संतोष पंजाबी (२२) आणि वरुण विनोद मिश्रा (२१) या पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई बुधवारी (ता. २५) पहाटेपर्यंत सुरू होती. छाप्यात ९ मॉनिटर, संगणक संच, मोबाईल हँडसेट, सिम कार्ड, विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि संबंधित साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले. ‘रुद्राटेक आयटी सर्व्हिस सेंटर’ या नावाने सुरू असलेल्या या ठिकाणाहून अमेरिकेतील नागरिकांची ऑनलाईन फसवणूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. संकेतस्थळ निर्मिती करून देण्याचे आमिष दाखवत आरोपी अमेरिकन नागरिकांशी संपर्क साधत होते. सुरुवातीला विश्वास संपादन करून ५० ते २०० डॉलर्स इतकी रक्कम ‘ॲडव्हान्स’ म्हणून बिटकॉइन स्कॅनरच्या माध्यमातून स्वीकारली जात असे. रक्कम मिळाल्यानंतर संबंधितांचा संपर्क क्रमांक ब्लॉक करून डेटा डिलीट करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सय्यद शबीर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक शाहू पोपट काळदाते यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. अंबरनाथ शहरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील ऑनलाइन फसवणुकीचे जाळे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास सुरू असून, आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT