मुंबई

हरी कृष्णा समूहाचा वार्षिक क्रीडा दिन उत्साहात साजरा

CD

हरी कृष्णा समूहाचा वार्षिक क्रीडादिन उत्साहात साजरा
एक हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांसह कुटुंबीयांचा सहभाग
मुंबई, ता. २५ : हरी कृष्णा एक्स्पोर्ट्स मुंबई आणि किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरी यांनी रविवारी (ता. २२) आपला वार्षिक क्रीडादिन २०२६ मोठ्या उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमात १,००० हून अधिक कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला. या उपक्रमातून कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांनी खेळासह आनंदाने भरलेला दिवस अनुभवला.

वार्षिक क्रीडादिनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह रत्न व दागिने उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, दोरीखेच, धावण्याच्या शर्यती, कॅरम आणि बॉक्स क्रिकेट, अशा विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट टीम स्पिरिट आणि क्रीडाभावनेने सहभाग घेतला. या वेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना गौरवण्यासाठी एकूण ३.५ लाखांचे बक्षीस देण्यात आले. वर्षभर शंभर टक्के उपस्थिती असलेल्या कर्मचाऱ्यांचा सुवर्ण नाण्यांनी सन्मान करण्यात आला, तसेच सातत्यपूर्ण शिस्त राखणाऱ्या कर्मचाऱ्यांना विशेष पुरस्कार देण्यात आले. या वेळी चेअरमन घनश्यामभाई ढोलकिया म्हणाले, ‘आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहोत, कारण सक्षम लोकच सक्षम संस्था घडवतात. इतर संस्थांनीही असे प्रयत्न स्वीकारले, तर संपूर्ण उद्योगाची कार्यसंस्कृती अधिक मजबूत होईल.’ तर महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, ‘अशा प्रकारचे क्रीडा आणि कर्मचारी-केंद्रित उपक्रम संस्थेमध्ये एकता, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात. हरी कृष्णा समूहाने कर्मचारी कल्याणासाठी घेतलेले उपक्रम आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी निश्चितच कौतुकास्पद आहे.’ ६०हून अधिक वेलनेस उपक्रमांसह हरी कृष्णा एक्स्पोर्ट्स कर्मचारी कल्याण आणि सहभाग यांना सातत्याने प्राधान्य देत आहे. हा वार्षिक क्रीडादिन संस्थेची टीमवर्क, आरोग्य आणि सकारात्मक कार्यसंस्कृतीत वाढवण्याची बांधिलकी दर्शवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपनं अर्धी लढाई जिंकली, पण विजय कठीण! १३१ व घटना दुरुस्ती विधेयक मंजुरीचं आव्हान, फक्त चर्चाच होण्याची शक्यता

Pune Bangalore Highway Expansion : प्रवाशांना दिलासा! पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग सहापदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात, जूनपर्यंत मार्ग पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात उष्णतेचा इशारा 16 ते 18 एप्रिलदरम्यान येलो अलर्ट

Viral video Nagpur: नागपूरात वाहतूक कोंडीचा गर्भवती मातेला फटका; राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान घटना, मोठी वाहतूक कोंडी, व्हिडीओ व्हायरल..

IPL 2026 सलग दोन विजयानंतर CSK चे टेन्शन वाढलं! संघातील प्रमुख खेळाडू संपूर्ण स्पर्धेतूनच झाला बाहेर

SCROLL FOR NEXT