शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती लवकरच!
मुंबई, ता. २५ : राज्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती व अनुकंपा भरतीप्रक्रियेबाबत सरकार सकारात्मक आहे. याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले. याविषयी आमदार सुधाकर अडबाले यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती.
मंत्री भुसे म्हणाले, २१ फेब्रुवारी २०२४ ते २८ मे २०२५ या कालावधीत झालेल्या नियुक्त्यांची विहित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून संच मान्यता, अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सुधारित अनुकंपा धोरण लागू करण्यात आले असून, पात्र प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश दिले जातील. संच मान्यता व इतर शैक्षणिक प्रशासकीय प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्याबाबतही सरकार सकारात्मक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.