मुंबई

सदस्य निवड लांबणीवर

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : कोणत्याही विषयावर चर्चा न करता सोमवारी (ता. २३) पार पडलेली महासभा गदारोळामुळे विषय मंजूर करीत गुंडाळण्यात आली असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. त्यात स्थायी समिती सदस्य निवडीचा विषय अचानक मागे घेण्यात आला. त्यानंतर ५ मार्चला महासभा घेण्याचे प्रशासनाकडून निश्चित करण्यात आले. अशातच आता सणांचा कालावधी आणि राजकीय स्तरावरील चर्चेनंतर सभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे स्थायी समिती सदस्य, स्वीकृत नगरसेवक, परिवहन समिती तसेच विविध विषय समित्यांवरील सदस्यांची निवड लांबणीवर पडणार असल्याचे दिसून येत आहे.

ठाणे महापालिकेने काही दिवसांपूर्वीच विशेष महासभेची अधिसूचना काढून स्वीकृतसह विशेष समित्यांवरील सदस्य निवडीसाठी अर्ज प्रक्रियेलाही सुरुवात करण्याची तयारी केली होती. त्यानुसार बुधवार (ता. २५)पासून अर्ज वितरण सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. होळीचा सण आणि रमजानचा महिना एकाच कालावधीत येत असल्याने काही नगरसेवकांचे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे सांगितले जाते. सर्वपक्षीय गटनेत्यांनी महापौरांकडे तारीख बदलण्याची विनंती केली. तसेच दिवसभरात घडलेल्या घडामोडींनंतर अचानक सभा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. तसेच नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, अर्ज वितरणाबाबतही गोंधळ निर्माण झाला. काही इच्छुकांनी अर्ज उपलब्ध नसल्याची तक्रार केली असून, प्रशासनाकडून स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही. त्यामुळे पुढील तारखेची घोषणा आणि नव्याने अर्ज प्रक्रिया कधी सुरू होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. समिती निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय गणिते, अंतर्गत चर्चा आणि समन्वय यामुळे विशेष महासभेची तारीख पुढे ढकलावी लागल्याचे स्पष्ट होत आहे.

समिती निवडीवर पडद्यामागील हालचाली
पालिकेतील विद्यमान संख्याबळ लक्षात घेता स्थायी समितीवर १६ सदस्यांची निवड अपेक्षित आहे. बहुमताच्या जोरावर शिवसेना शिंदे गटाला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता असून, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आणि एमआयएमलाही प्रतिनिधित्व दिले जाणार असल्याचे संकेत आहेत. याशिवाय शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण, क्रीडा-सामाजिक व सांस्कृतिक आणि झोपडपट्टी पुनर्वसन या पाच विषय समित्यांवर प्रत्येकी नऊ सदस्यांची निवड होणार आहे. परिवहन समितीत एका पदसिद्ध सदस्यासह १३ सदस्य असतात. त्यापैकी १२ सदस्यांची निवड सभेत होणार आहे. आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची मानली जाणारी परिवहन समिती मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये चुरस वाढली आहे.

वरिष्ठ पातळीवर बैठक
या सर्व घडामोडींवर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. सभेची तारीख जाहीर करण्यात घाई का करण्यात आली, याबाबत त्यांनी स्थानिक पदाधिकारी व प्रशासनाकडून स्पष्टीकरण मागितल्याचे सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात लाच घेताना महसूल सहाय्यक अधिकारी रंगेहात पकडला

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT