मुंबई

‘चॅट बोट’चा ग्रामीणवासियांना आधार

CD

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यापासून ते जन्म-मृत्यू, विवाह नोंदणी करण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये पायपीट करावी लागत होती. तसेच लांबच लांब रांगांमध्ये नागरिकांचा वेळ अधिक खर्ची पडत होता. याची दखल घेत जिल्हा परिषदेने व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना घरबसल्या शासकीय सेवांचा लाभ मिळत असून, मागील दीड महिन्यात सुमारे साडेपाच हजार दाखल्यांचे वाटप करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

ठाणे जिल्हा परिषदेमार्फत नागरिकांना शासकीय सेवा, योजना व माहिती अधिक सोप्या, जलद आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावी, या उद्देशाने व्हॉट्सॲप चॅटबॉट सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेच्या माध्यमातून नागरिकांना आता कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता न पडता व्हॉट्सॲपद्वारे जिल्हा परिषदेशी थेट संवाद साधता येत आहे. व्हॉट्सॲप चॅटबॉट हा मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध असून, केवळ काही सोप्या टप्प्यांमध्ये नागरिकांना आवश्यक माहिती मिळू शकते. यामध्ये विविध विभागांच्या सेवा, शासकीय योजनांची माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच अर्जाच्या सद्य:स्थितीची माहिती नागरिकांना सहजपणे मिळणार आहे.

व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि ठाणे डोअरस्टेप डिलिव्हरी पोर्टलशी पूर्णतः एकत्रित करण्यात आला असून, डोअरस्टेप डिलिव्हरी ही ठाणे जिल्हा परिषदेमार्फत विकसित केलेली एक नावीन्यपूर्ण व्यवस्था असून, जिल्हा परिषद व ग्रामीण विकास विभागाशी संबंधित विविध शासकीय सेवा नागरिकांपर्यंत थेट पोहोचविणे हा तिचा मुख्य उद्देश आहे. मागील दीड महिन्यात पाच हजार ५६८ नागरिकांचे विविध दाखल्यांसाठी अर्ज दाखल केले. त्यापैकी पाच हजार १२२ अर्ज वितरित करण्यात आल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी दिली.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रशासन थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा आमचा उद्देश असून, अधिकाधिक नागरिकांनी ८२६३८४१९०७ या व्हॉट्सॲप चॅटबॉटचा वापर करून शासकीय सेवांचा लाभ घ्यावा.
- रणजित यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, ठाणे जिल्हा परिषद

जिल्हा परिषद सेवा अर्ज प्राप्त प्रकिया सुरू स्थगित वितरित
जन्म नोंद ११५७ ५२ ९ १०९६
मृत्यू नोंद ४४१ २० ३ ४१८
विवाह नोंदणी ५६४ २२ ६ ५३६
दारिद्र्यरेषेखाली नोंदणी ४६१ ४ १० ४४७
ग्रामपंचायत येणे बाकी नाही ३५६ २५ ० ३३१
नमुना क्र. ८ ११७५ २४ १ ११५०
निराधार १५१ ४२ ० १०९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bill Gates Confession : मोठी बातमी! ‘एपस्टीन फाइल्स’ प्रकरणी बिल गेट्स यांचा धक्कादायक कबुलनामा

भूत, धमाल आणि ओजी स्वॅग: ‘भूत बंगला’मधील ‘रामजी आके भला करेंगे’ गाण्याचा टीझर रिलीज

Blocked Nose & Headache: सततचे नाक चोंदणे आणि डोकेदुखीः साधी ऍलर्जी की नाकातील घातक गाठी? वेळीच व्हा सावध !

Kidney Transplant : हलाखीच्या परिस्थितीतही बाप ठरला ‘जीवनदाता’; वडिलांनी दिली मुलाला किडनी

Palghar: पालघरकरांचे हाल! तारापूर परिसरात हवेची गुणवत्ता ढासळली, विविध आजारांमुळे स्थानिक बेजार

SCROLL FOR NEXT