मुंबई

वेश्याव्यवसाय प्रकरणी महिला दलाल अटकेत, दोन पीडितांची सुटका

CD

महिला दलाल अटकेत
वेश्याव्यवसायप्रकरणी दोन पीडितांची सुटका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २५ : वेश्याव्यवसायासाठी महिलांना प्रवृत्त करणाऱ्या एका महिला दलालाला ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सापळा रचून अटक केली. अटकेतील महिलेच्या तावडीतून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. शिळ-कल्याण रोडवरील पडलेगाव परिसरातील एका हॉटेलमध्ये ही कारवाई मंगळवारी (ता. २४) करण्यात आली.
गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून संबंधित महिला काही असहाय्य महिलांना फूस लावून वेश्याव्यवसायासाठी बोलावत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून मंगळवारी (ता. २४) दुपारी संशयित महिला दलालाला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
याप्रकरणी डायघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सुटका करण्यात आलेल्या दोन्ही महिलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने उल्हासनगर येथील शासकीय संरक्षणगृहात हलविण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव व सहाय्यक पोलिस आयुक्त (प्रतिबंध) रवींद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक वैशाली गोरडे व त्यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

Gas Cylinder Black Market : घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT