भिवंडी, ता. २५ (वार्ताहर) : टाटा मेमोरियल हॉस्पिटल हे मुंबई व एमएमआर क्षेत्रातील कॅन्सर रुग्णांवर उपचार करणारे प्रमुख रुग्णालय आहे. ठाणे व पालघर जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी मुंबईपर्यंत प्रवास करावा लागतो. या प्रवासात वेळ व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याने एमएमआर क्षेत्रात टाटा कॅन्सर रुग्णालयाचा विस्तारित कक्ष सुरू करावा, अशी मागणी आमदार रईस शेख यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पी अधिवेशनात केली.
पर्यायी उपाय म्हणून ८५० कोटी रुपयांच्या जिल्हा रुग्णालयात कॅन्सर उपचार कक्ष सुरू करावेत, अशीही मागणी त्यांनी सभागृहात केली. तसेच भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व उपकरणे उपलब्ध करून द्यावीत, असेही त्यांनी नमूद केले. सरकारी रुग्णालयात वेळेवर उपचार न मिळाल्याने रुग्णांना खासगी रुग्णालयांचा पर्याय निवडावा लागतो आणि त्यामुळे आर्थिक भार वाढतो, याकडे लक्ष वेधत सर्वसामान्यांना सुलभ व किफायतशीर आरोग्य सेवा देणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रश्नावर उत्तर देताना आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी शासन स्तरावर बैठक घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. तसेच आयजीएम रुग्णालयातील डायलिसिस केंद्र पीपी तत्त्वावर चालविण्याचा प्रस्ताव आल्यास सरकार सकारात्मक विचार करेल, असेही त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.