मुंबई

औषध पुरवठादार मेडिकल चालक गजाआड! बदलापूरमध्ये स्त्रीबीज तस्करी प्रकरणात पाचवी अटक

CD

औषधे पुरवणारा गजाआड !
स्त्रीबीज तस्करीप्रकरणी पाचवी अटक

बदलापूर, ता. २५ (बातमीदार)ः बदलापुरातील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचा तपास पोलिसांकडून वेगाने सुरू आहे. या गंभीर रॅकेटमध्ये आज पाचवी अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या टोळीला बेकायदेशीर औषधे व इंजेक्शन पुरवणाऱ्या मेडिकल चालकाला विठ्ठलवाडी परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर अटकेतील चौघांना आज पोलिसांकडून अंबरनाथ न्यायालयात हजर करण्यात आले.
डॉक्टरांच्या कोणत्याही वैद्यकीय चिठ्ठीशिवाय आरोपी महिलांना औषधे व इंजेक्शनचा पुरवठा करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. सुमीत सोनकांबळे (३८) असे या आरोपीचे नाव असून, सुरुवातीला त्याने या प्रकरणात सहभाग नाकारला; मात्र मोबाईल व आर्थिक व्यवहारांची तपासणी केल्यानंतर संबंधित टोळीशी थेट संपर्क आणि लाखोंचे व्यवहार झाल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आली आहे.
सोनोग्राफीसाठी मदत करणाऱ्या सोनल गरेवाल हिला मंगळवारी (ता. २४) अटक करण्यात आली होती. तसेच मुख्य आरोपी सुलक्षणा, अश्विनी आणि मंजुषा यांची पोलिस कोठडी बुधवारी (ता. २४) संपल्याने या तीन महिलांसह आज अटक करण्यात आलेल्या सुमीत सोनकांबळे याला बदलापूर पूर्व पोलिसांकडून अंबरनाथ येथील न्यायालयात हजर करण्यात आले आहे. दरम्यान, हे रॅकेट अत्यंत मोठ्या प्रमाणावर कार्यरत असून, त्याचे धागेदोरे संपूर्ण देशभरात पसरले असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आरोपींना २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी!
न्यायालयात हजर करण्यात आलेल्या तीन महिला व एका आरोपीला न्यायालयाने २८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या चौघांपैकी तीन महिलांना सुरुवातीलाच अटक करण्यात आली होती. दरम्यान, आज पाचव्या नव्या पुरुष आरोपीला अटक केल्यानंतर, कोठडीची मुदत संपलेल्या तीनही महिला आरोपींसह चौघांनाही न्यायालयात हजर करण्यात आले. प्रकरणाचे गांभीर्य आणि पुढील तपासासाठी चौघांची संयुक्त चौकशी आवश्यक असल्याचे नमूद करत न्यायालयाने त्यांच्या कोठडीत वाढ केली आहे.

पकडलेल्या महिला दलाल?
बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करीप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींना अंबरनाथ न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी तपास अधिकारी तसेच आरोपींच्या वकिलांनी न्यायालयासमोर आपली भूमिका मांडली. दरम्यान, पकडण्यात आलेल्या आरोपी महिला या केवळ दलाल म्हणून काम करत होत्या, स्त्रीबीज तस्करीशी त्यांचा थेट संबंध असल्याचे ठोस पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत, असा दावा आरोपींच्या नातेवाइकांनी केला.


आरोपींच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद!
अटकेतील महिला आरोपींचा तस्करीच्या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचा दावा आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात केला. दिलीप वळंज, राजेंद्र गाडेकर, चरण पँथेलिया हे आरोपी महिलांचे वकील असून, आरोपी सुलक्षणा गाडेकर यांच्या घरातून जप्त करण्यात आलेली औषधे व इंजेक्शन यांचा केमिकल अ‍ॅनालिसिस रिपोर्ट अद्याप पोलिसांनी सादर केलेला नसल्याने ही औषधे तस्करीसाठीच वापरली जात होती का, याबाबत पुरावा उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले आहे. गाडेकर यांच्या पतीच्या यकृताच्या आजारावर तसेच गतिमंद मुलाच्या उपचारासाठी ही औषधे घरात असल्याची शक्यता वकिलांकडून वर्तवण्यात आली आहे. गरजू महिलांना २५ ते ३० हजार रुपये देऊन स्त्रीबीज विक्री केल्याचा कोणताही न्यायिक पुरावा पोलिसांनी सादर केलेला नसल्याचा आणि सर्व वैद्यकीय बाबी निदर्शनास आणून दिल्यानंतरही या प्रकरणातील डॉक्टर, आयव्हीएफ सेंटरमधील आरोपी अटकेपासून दूर असल्याचा गंभीर आरोप वकिलांकडून करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT