मुंबई

कल्याणमधील उद्यानांना अवकळा

CD

कल्याणमधील उद्यानांना अवकळा
दारूच्या बाटल्यांचा खच; ठेकेदारावर कारवाईसाठी आयुक्तांना निवेदन

कल्याण, ता. २६ (वार्ताहर) : शहरातील पश्चिम परिसरातील महापालिकेची उद्याने सध्या अस्वच्छता आणि दुरवस्थेच्या विळख्यात सापडली आहेत. पालिकेने या उद्यानांच्या देखभालीसाठी ठेका दिला असूनही, ठेकेदाराकडून होणाऱ्या निष्काळजीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नावर शिवसेनेचे उपशहर प्रमुख व माजी नगरसेवक मोहन उगले यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांना निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

कल्याण पश्चिमेतील फडके मैदान, धर्मवीर आनंद दिघे नाना-नानी पार्क आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचे हास्य क्लब भरतात. मात्र, या ठिकाणी सध्या खालील समस्या उद्भवत असल्याचे मोहन उगले यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

उद्याने देखभाल दुरुस्तीसाठी ठेका दिला असेल, तर त्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. जर नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा मिळत नसतील आणि तिथे अनुचित प्रकार घडत असतील, तर संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हायलाच हवी. आयुक्तांनी याकडे तातडीने लक्ष देऊन उद्यानांची स्वच्छता आणि सुरक्षा सुनिश्चित करावी, अशी प्रतिक्रिया मोहन उगले यांनी दिली.

अस्वच्छता व दुर्गंधी
उद्यानातील शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय असून, तिथे प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. तसेच उद्यानांमध्ये सुरक्षा रक्षक नसल्यामुळे रात्रीच्या वेळी तिथे कचरा, खाद्यपदार्थ आणि दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला असतो. उद्यानांच्या जागेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी (कॅन्टीन) केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. संपूर्ण प्रकरणाची माहिती मोहन उगले यांनी वारंवार उद्यान अधीक्षक संजय जाधव यांना दिली होती, परंतु संबंधित विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष; प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

T20 WC, IND vs ZIM: भारतीय संघ २ बदलांसह उतरणार; झिम्बाब्वेविरुद्धच्या Playing XI मध्ये स्टार खेळाडू परतले, कोणाचा पत्ता झाला कट ?

Indian Railways Digital Initiative : भारतीय रेल्वेने उचललं मोठं डिजिटल पाऊल!, ‘रेल टेक पोर्टल’ अन् ‘ई-आरसीटी’ प्रणाली सुरू

Latest Marathi News Live Update : तीन तास बसूनही आमचा एफआयआर घेतला नाही - रोहित पवार

SCROLL FOR NEXT