मुंबई

१२१ एकरवर नवीन शहर

CD

१२१ एकरवर नवीन शहर
केळवे रोड येथील जमीन विकासासाठी सिडकोची पावले
निखिल मेस्त्री ः सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. २६ ः येथील जिल्हा मुख्यालय संकुल उभारणीच्या मोबदल्यात मिळालेल्या पालघर तालुक्यातील जमिनी विकसित करण्याच्या दृष्टीने सिडकोने पावले उचलली आहेत. याच अनुषंगाने केळवे रोड येथील १२१ एकर जमिनीवर ६० वर्षांच्या भाडेपट्टा करारातून नवीन गृहनिर्माण संकुले, औद्योगिक कर्मचारी संकुले, शाळा, रुग्णालये, शॉपिंग सेंटर्स अशा सुविधांनी परिपूर्ण शहर उभारणीसाठी विकासकांना निमंत्रित केले आहे.
ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून ऑगस्ट २०१४ मध्ये पालघर महाराष्ट्र राज्यातील ३६ वा जिल्हा झाला. जिल्हा स्थापन झाल्यानंतर जिल्हा मुख्यालये बांधण्याची गरज लक्षात घेता शहराजवळ कोळगाव येथील दुग्धविकास विभागाच्या सरकारी जमिनीवर सिडकोने मुख्यालये उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ४४० हेक्टर जमिनीपैकी १०३.५७.९० हे.आर क्षेत्रावर मुख्यालय संकुल व तत्सम भौतिक कामे विकसित करण्यात आली. त्या मोबदल्यात उर्वरित ३२७.३७ ही जागा सिडकोला देण्याचा शासन निर्णय जून २०१६ मध्ये झाला, तर मुख्यालयाच्या उभारणीनंतर आणखी काही कामे करणाऱ्या सिडकोला इतर ठिकाणांच्या जमिनी देण्यात आल्या. त्यात केळवे येथील सरकारी जमिनीचा समावेश होता.
-------------------------------------
दळणवळणाची व्यवस्था
- पालघर हा औद्योगिक विकासासाठी प्रचंड क्षमता असलेला परिसर आहे. अनेक विकास प्रकल्पांमुळे पालघरमध्ये चौथी मुंबई विकसित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याच अनुषंगाने केळवे रोड येथील जमीन भाडेपट्ट्यावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- या निर्णयामुळे आर्थिक गुंतवणूक आणि शाश्वत विकास होईल. ज्यामुळे उद्योग, व्यवसाय आणि रोजगारासाठी नवीन संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. तसेच औद्योगिक क्षेत्राच्या जवळ, उत्तम दळणवळणाच्या व्यवस्थेमुळे नवीन आदर्श शहर उभे राहील, असा सिडकोला विश्वास आहे.
------------------------------
एकात्मिक विकासाचे धोरण
ठाणे-पालघर-रायगड प्रादेशिक विकास योजनेत भाडेपट्ट्याने देण्यात येणाऱ्या जमिनीचा विकास विशेष नियोजन प्राधिकरण, इतर परवानगी यांच्या अधीन राहून राहत्या घरांचा आणि त्याच्याशी संबंधित पायाभूत, मूलभूत, भौतिक सुविधा म्हणजेच गृह निर्माण संकुलांचा विकास केला जाणार आहे. या भूखंडावर औद्योगिक आणि वाणिज्यिक प्रयोजनला बंदी असेल, असे सिडकोने म्हटले आहे, तर शासनाच्या २०२० च्या एकात्मिक विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावलीनुसार नवीन शहराची उभारणी केली जाणार आहे
----------------------------
सहा भूखंडांचा समावेश
केळवे रोड येथील सर्वेक्षण क्रमांक ४६२ (५.९४ हे),४६६ (७.९९ हे),४६७ (६.६६ हे),५२० (१३.९८ हे),५२१ (८.८५ हे), आणि ५२२ (७.८ हे) अशा सहा एकत्रित भूखंडांवर गृह निर्माण संकुलांचा विकास केला जाणार असून, त्याचे एकत्रित क्षेत्र ५१.२४ हेक्टर इतके आहे. केळवे रोड भागातील टोकराळे येथे रिलायन्स इंडस्ट्रीजमार्फत यार्न प्रकल्प उभारला जाणार आहे. सिडकोमार्फत भाडेपट्ट्यासाठी देण्यात येणारी जमीन प्रकल्पातील कर्मचाऱ्यांसाठी रिलायन्स घेण्याची दाट शक्यता आहे. या प्रकल्पासाठी ही जमीन भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय झाल्याची चर्चा आहे.
------------------------
विकासामागचा उद्देश
- पालघर प्रदेशात औद्योगिक, निवासी केंद्र निर्माण करणे.
- शाश्वत, समावेशक, सर्वंकष विकास पद्धतींचे एक आदर्श शहर स्थापन करणे.
- रहिवासी आणि आसपासच्या उद्योगांना आधुनिक सुविधा आणि पायाभूत सुविधांसह उच्च दर्जाचे राहणीमान आणि कामाचे वातावरण प्रदान करणे.
- प्रदेशात नावीन्यपूर्णता आणि उद्योजकतेची संस्कृती जोपासणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India GDP: महत्त्वाची बातमी! १० वर्षांचा नियम संपला; देशाच्या महसूल गणनेत मोठा बदल, नवे सूत्र कधीपासून लागू होणार?

Rohit Sharma: चाहत्याने त्याच्या मुलीचे नाव समायरा ठेवले, रोहितला जेव्हा हे समजले, तेव्हा... VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगरच्या नगर–मनमाड महामार्गावर भीषण अपघात; ४ ते ५ जण गंभीर जखमी

MLA Amol Mitkari : अजितदादांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करा; आमदार अमोल मिटकरी यांची अधिवेशनात मागणी

DGCA New Rules : विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!, ‘डीजीसीए’ने आता बदलले नियम

SCROLL FOR NEXT