एस. व्ही. रोडवरील अर्धवट काँक्रीटीकरणामुळे धुळीचा त्रास; साफसफाईची मागणी
जोगेश्वरी, ता. ३ (बातमीदार) : अंधेरी पश्चिम येथील एस. व्ही. रोडवरील पोस्ट कार्यालयाजवळ सध्या रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. या कामाचा काही भाग पूर्ण झाला असला तरी उर्वरित काम प्रलंबित असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे.
पूर्ण झालेल्या रस्त्याच्या भागावर माती व धुळीचे थर साचले असून सततच्या वाहनांच्या येण्या-जाण्यामुळे ही धूळ हवेत उडत आहे. परिणामी, पादचारी, वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वारांना घसरगुंडीचा धोका निर्माण झाला असून रस्त्याकडील दुकानदारांनाही धुळीमुळे व्यवसायात अडचणी येत आहेत. विशेषतः सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत या मार्गावर रिक्षा, दुचाकी आणि अन्य वाहनांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत रस्त्याची नियमित साफसफाई होत नसल्यास श्वसनविकारांसह इतर आरोग्य समस्या निर्माण होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. महापालिकेने तातडीने पूर्ण झालेल्या रस्त्याच्या भागाची स्वच्छता करून नियमित पाणी फवारणी करावी, तसेच उर्वरित काम वेगाने पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.