मुंबई

वडवलीत वनराई बंधाऱ्यासाठी श्रमदान

CD

वडवलीत वनराई बंधाऱ्यासाठी श्रमदान
संत निरंकारी मंडळ व शासकीय योजनेचा संयुक्त उपक्रम; जलसंधारणाला चालना
श्रीवर्धन, ता. २६ (बातमीदार) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि संत निरंकारी मंडळाच्या संयुक्त विद्यमाने ग्रुप ग्रामपंचायत वडवली येथे रविवारी (ता. २२) ग्रामस्थांच्या श्रमदानातून वनराई बंधारा उभारण्यात आला. शासनाच्या योजनेला सामाजिक संस्थेच्या सेवाभावाची जोड मिळाल्याने हा उपक्रम प्रभावीपणे साकार झाला असून, जलसंधारणासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
प्रकल्प अमृत आणि स्वच्छ जल-स्वच्छ मन या अभियानांतर्गत जलसंवर्धन, स्वच्छता व पर्यावरण जतन यासाठी मंडळाने लोकसहभागातून उपक्रम राबविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. वडवलीतील वनराई बंधारा उभारणी हा त्याच प्रयत्नांचा एक भाग ठरला. वडवली हे गाव श्रीवर्धन तसेच म्हसळा तालुक्यांना ताजा भाजीपाला पुरविणारे महत्त्वाचे कृषी केंद्र म्हणून ओळखले जाते. परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला उत्पादन करत असल्याने वर्षभर पाण्याची उपलब्धता हा त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो. या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेला वनराई बंधारा पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविण्यास मदत करणार आहे. त्यामुळे भूजल पातळी वाढणे, विहिरींचे पुनर्भरण होणे आणि उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा परिणाम कमी होणे अपेक्षित आहे. बंधारा उभारणीवेळी उपस्थित असलेले पंचायत समिती श्रीवर्धनचे विस्तार अधिकारी किशोर नागे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामविकास प्रक्रियेत लोकसहभाग वाढविणे हा आहे.
या श्रमदान उपक्रमात वडवली येथील संत निरंकारी सत्संगचे मुखी गणेश नाकती व सेवादल संचालक दत्ता नाकती यांच्या नेतृत्वाखाली शेकडो संत निरंकारी संतजनांनी उत्साहाने सहभाग घेतला. ग्रामपंचायत वडवलीचे ग्रामपंचायत अधिकारी गोविंदा कासले व कायमचारी नामदेव रोटकर, सुनील कडू आदींनी प्रत्यक्ष काम करून उपक्रम यशस्वी केला. सर्व घटकांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे वनराई बंधारा अल्पावधीत पूर्णत्वास गेला.

छायाचित्र :
श्रीवर्धन ः संत निरंकारी मंडळाकडून वनराई बंधारा बांधण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT