भालिवडी येथे सामूहिक गीत कार्यक्रम उत्साहात
कर्जत, ता. २६ (बातमीदार) : कर्जत तालुक्यातील भालिवडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळेत श्री गुरु तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहीदी समागमनिमित्त सामूहिक गीताचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण, रायगड अंतर्गत मा. विभागीय आयुक्त यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी किशन जावळे, तहसीलदार धनंजय जाधव, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, गटशिक्षणाधिकारी तसेच प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे उपस्थित होते. लेझीम पथकाने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थिनींनी तिरंगी टोपी व फुग्यांसह अखंड भारताच्या नकाशाची आकर्षक प्रतिकृती साकारत समूहगीत सादर केले. एका विद्यार्थिनीने गुरु तेग बहादुर यांची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमात विशेष आकर्षण निर्माण केले.
सामूहिक गीतानंतर मान्यवरांच्या हस्ते तिरंगी फुगे आकाशात सोडण्यात आले. विविध स्पर्धांतील विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभही झाला. प्रास्ताविकात प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट सांगितले, तर जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.