तुर्भे, ता. २६ (बातमीदार) : सानपाडा सेक्टर दोन येथील पालिकेचा भूखंड क्रमांक १३वर लवकरच नागरिकांसाठी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजनाअंतर्गत या केंद्राला मंजुरी मिळाली आहे. सानपाडा परिसरातील हजारो नागरिकांना घराजवळच प्राथमिक आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. पुढील एका महिन्यात पोर्टा केबिन उभारणीची प्रक्रिया पूर्ण करून हे केंद्र नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी सामाजिक कार्यकर्ते नीलेश सोमाजी कचरे यांनी पाठपुरावा केला. सानपाडा परिसरातील आरोग्यविषयक अडचणी लक्षात घेऊन त्यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारात हा प्रस्ताव मांडला होता. प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यांनी सरकार आणि प्रशासन यांच्यात समन्वय राखला होता. प्राथमिक आरोग्य तपासणी व उपचार, पॅथोलॉजी चाचण्या, तज्ज्ञ डॉक्टरांचे आरोग्य मार्गदर्शन, सरकारी आरोग्य योजनांची माहिती व लाभ, तसेच मोफत किंवा सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.