मुंबई

शिक्षक संघाचे ६ मार्चला राज्यस्तरीय अधिवेशन

CD

टोकावडे, ता. २६ (बातमीदार) : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांचे राज्यस्तरीय अधिवेशन ६ मार्चला मुंबईत होणार आहे. या अधिवेशनाला राज्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ठाणे जिल्हाध्यक्ष भगवान भगत यांनी केले आहे. अधिवेशनात शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
अधिवेशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय शिक्षणमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम यांची उपस्थिती लाभणार आहे. आमदार निरंजन डावखरे हे स्वागताध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. प्रलंबित मागण्यांमध्ये शिक्षण सेवक पद रद्द करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, टीईटीसंदर्भात धोरण निश्चित करणे, मुख्यालयी राहण्याची अट रद्द करणे, १०० टक्के पदवीधर शिक्षकांना वेतनश्रेणी देणे, २४ वर्षांनंतरची वरिष्ठ वेतनश्रेणी विनाअट देणे, १५ मार्च २०२४चा संचमान्यता सरकार आदेश रद्द करणे, ऑनलाइन कामे बंद करणे, पालिका/नगरपालिका शाळांतील शिक्षकांचा पगार सरकारकडून देणे, कॅशलेस वैद्यकीय सुविधा, पोषण आहार योजना स्वतंत्र यंत्रणेकडे देणे, बदली प्रक्रिया सुलभ करणे आदींचा समावेश आहे. दरम्यान, ५ मार्चला यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शिक्षण परिषद असून, ‘शिक्षण व गुणवत्ता विकास’ या विषयावर विशेष चर्चासत्र होणार असल्याची माहिती संघाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India GDP: महत्त्वाची बातमी! १० वर्षांचा नियम संपला; देशाच्या महसूल गणनेत मोठा बदल, नवे सूत्र कधीपासून लागू होणार?

Rohit Sharma: चाहत्याने त्याच्या मुलीचे नाव समायरा ठेवले, रोहितला जेव्हा हे समजले, तेव्हा... VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : धुळे–सुरत महामार्गावर मोठी दुर्घटना; गॅस टँकरला भीषण आग

MLA Amol Mitkari : अजितदादांच्या नावाने राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करा; आमदार अमोल मिटकरी यांची अधिवेशनात मागणी

DGCA New Rules : विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी!, ‘डीजीसीए’ने आता बदलले नियम

SCROLL FOR NEXT